Navi Mumbai: पाण्याच्या टाकीत पडून सहावर्षीय मुलाचा मृत्यू

Crime news: वाशीतील घटना; पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Navi Mumbai: पाण्याच्या टाकीत पडून सहावर्षीय मुलाचा मृत्यू
Updated on

Latest Vashi News: वाशी सेक्टर १४ मधील उद्यानामध्ये खेळताना पाण्याच्या टाकीत पडून सिद्धार्थ विशाल उघडे (वय सहा) याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २) रात्री घडली. याप्रकरणी महापालिकेच्या वाशी विभागातील उद्यान निरीक्षक, ठेकेदार, सुरक्षारक्षक, उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्याविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


उघडे कुटुंबीय वाशी सेक्टर १५ मध्ये राहतात. विशाल गोरक्षनाथ उघडे उद्यानामध्ये वॉकिंगसाठी जात असतात. शनिवारी रात्री आठ वाजता ते आपल्या सहा वर्षांचा मुलगा सिद्धार्थ याच्यासोबत उद्यानामध्ये वॉकिंगसाठी गेले होते. विशाल हे वॉकिंग करत असताना सिद्धार्थ इतर मुलांसह लपाछपी खेळत होता. याचवेळी सिद्धार्थ उद्यानातील झाकण उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पडला. बराच वेळ झाल्यानंतरदेखील सिद्धार्थ दिसत नसल्याने विशाल यांनी मुलाचा शोध घेतला; मात्र तो कुठेच सापडला नाही.

Navi Mumbai: पाण्याच्या टाकीत पडून सहावर्षीय मुलाचा मृत्यू
Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.