जेएनपीए बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) या गावाचे ४० वर्षांत पुनर्वसन झाले नाही. ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
दरम्यान, सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीवरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता.