राणांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांकडून राज्य सरकारला अहवाल सादर

अहवालात नवनीत राणा यांना पाणी दिल्याचा फोटोदेखील सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवनीत राणा
नवनीत राणासकाळ
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठन करणाचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अटकेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. आपण मागासवर्गीय (Scheduled Caste) असल्यामुळे आपल्याला तुरुंगात पाणी दिलं नसल्याचा आरोप राणा यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mumbai Police Submit Report On Rana Allegations)

नवनीत राणा
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विद्यार्थ्यांचा मंत्रालयात ठिय्या

अहवालात नवनीत राणा (Navneet Rana) यांना पाणी दिल्याचा फोटोदेखील (Photographs) सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नवनीत राणांनी पोलीस ठाण्यातील वॉशरुमचा (Washroom) वापर केल्याचाही दावा यामध्ये करण्यात आला आहे. तसेच राणा यांच्याकडून करण्यात आलेले आरोपही पोलिसांनी फेटाळून लावले असून, सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर राणा यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

राणा यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य चहा आणि बिस्लरीच्या बाटलीने पाणी पित असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे राणा यांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून हे सर्व खोटे असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, या सर्व प्रकणावर मुंबई पोलिसांचे पुढचे पाऊलं नेमके काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवनीत राणा
''भारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नाही''

मागासवर्गीय असल्यानेच पोलिसांकडून छळ; राणांचे पोलिसांवर आरोप

आपण मागासवर्गीय (Scheduled Caste) असल्यामुळे आपल्याला तुरुंगात पाणी दिलं नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तसेच त्यांनी याबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिरला यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी आपल्याला जातीवरून पोलीस ठाण्यामध्ये छळ केल्याचा नमुद केले होते. एवढेच नव्हेतर, खालच्या जातीची असल्याने आपल्याला बाथरूमचा वापरदेखील करू न दिल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला होता. (Navneet Rana Write Letter To Lok Sabha Speaker)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.