राणा दाम्पत्याची रवानगू सांताक्रुझ पोलिस स्टेशनमधून जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला कारागृहामध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर रवी राणा यांना अर्थर रोड कारागृहाचे पत्र घेऊन तळोजा कारागृहामध्ये पाठवण्यात येणार आहे. जोपर्यंत जामीन मिळत नाही. तोपर्यंत या दोघांना जेलमध्ये राहावे लागणार आहे, २९ एप्रिलपर्यंत जामीनाची सुनावणी होणार आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सकाळी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांना तुरुंगात हलवण्यापूर्वी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. सुमारे चार तासांनंतर या चाचणीचा अहवाल समोर आला असून चाचणी निगेटिव्ह आहे. त्यामुळं आता या दोघांना तुरुंगात हलवण्याच्या तयारी करण्यात येत आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 353 अन्वये मुंबईतील खार पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
खार पोलिसांनी कारवाई करत काही शिवसैनिकांनाही ताब्यात घेतलं आहे. राणांच्या घराबाहेर बॅरिकेड्स ओलांडून जाणाऱ्या सहा शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई केली. याव्यतिरिक्त किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगड फेकलेल्या व्यक्तींचाही शोध सुरू आहे.
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर येत्या २९ एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे. जामीन याचिकेवर येत्या २७ तारखेपर्यंत सरकारला बाजू मांडण्याचं सांगण्यात आलं आहे. (Sedition on Navneet Rana)
शासनाला दिलेल्या आव्हासाठी आणि मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दहा कलमं लावण्यात आली आहेत. तर, १२४ कलमानुसार त्यांना नोटीस देण्यात आली होती. यावर कारवाई होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी दिली.
सुनावणीला सुरुवात होताच सरकारी वकील प्रदिप घरत यांनी एफआयआरच्या प्रतिचं वाचन सुरू केलंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. यावर राणांच्या वकिलांनी युक्तीवाद करत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सांताक्रुज पोलिस स्टेशन बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नवनीत राणा आणि रवी राणांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलंय. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांची सुनावणी पार पडणार आहे.
सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना संपूर्ण प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी भाजप नेत्यांनी केल्याची सोमय्यांनी सांगितलं. केंद्रात राजीवकुमार यांच्याशी कॉल झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनंतर भाजप दिल्लीत जाणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.
शिवसैनिक तीन किमी दूर होते असं या एफआयआरमध्ये लिहिलं आहे. खोटं आहे.
काल माझ्या वर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केले हल्ला होता
मी पोचण्या पूर्वी 70 ते 80 शिवसेनिकांची व्यवस्था केली होती
मला शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला, 70 ते 80 शिवसैनिक माझ्यावर धावून आले
या सर्वाला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत
नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या
नवनीत राणा यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल
खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय
कलम 353 अंतर्गत गुन्हा
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
कालच्या सर्व घडामोडी नंतर खार पोलीस ठाण्यात एकूण ४ गुन्ह्यांची नोंद
सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेची तक्रार
किरीट सोमय्या यांच्या चालकावरही खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
२७९ कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सोमय्या यांच्या चालकाने शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार
राणांना रातोरात सांताक्रुझ पोलीस स्टेशनला हालवलं, मुंबईत घडामोडींना वेग
राणा दाम्पत्य यांच्यावर खार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा झाल्यानंतर त्यांना रात्री उशिरा संताक्रुज पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आले आहे.आज दुपारी 12 नंतर राणा दाम्पत्याला वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात येईल.दरम्यान न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
दगडफेक झाली हे खरं - दिलीप वळसे पाटील
सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नसल्याचं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. कायद्यानुसार ते काम करत आहेत. मी सोमय्यांवरील हल्ल्याचं उत्तर दिलं आहे. दगडफेक झाली हे खरं. पण कोणाकडून झाली. काय झालंय, हा तपासाचा भाग असल्याचं गृहमंत्री म्हणाले. राणा यांच्या प्रकरणाचीही चौकशी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मला जीवे मारण्याचा प्रयत्न - सोमय्या
हल्ला झाल्यानंतर सोमय्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला. काच फुटलेल्या गाडीत ते बसून होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या दबावात माझी एफआयआर दिली
माझ्या नावाने बोगस तक्रार दिली
मला जीवे मारण्यााच प्रयत्न
माझ्यावर हल्ला झाला
खार पोलीस स्टेशनचे अधिकारी...आम्ही काळजी घेतो असं म्हणाले
आणि पोलिसांनी मला त्या जमावात ढकलून दिलं
मुंबई पोलिसांनी बोगस एफआयआर दिलीय
माझ्या सांगण्यानुसार FIR घेतला नाही
संजय पांडे यांच्या दबावाखाली वेगळीच FIR दाखल झाली असून त्यावर मी सही केलेली नाही
सोमवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांची आम्ही भेट घेणार आहोत
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. यानंतर दिवसभराच्या राजकीय नाट्याचा अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला.
मात्र, त्यात किरीट सोमय्यांची भर पडली. खार पोलीस स्टेशनला राणांना भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि सोमय्या जखमी झाले. (Kirit Somaiya attacked in khar of mumbai)
अखेर सोमय्यांची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, ही बोगस असल्याचं त्यांनी म्हटलं. सोमय्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ शिवसैनिकांनीही प्रति तक्रार दाखल करून सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला. (Shivsena Vs Navneet Rana)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.