Mumbai : देवीचे दर्शन होताच दोन गट आपापसात भिडले; 23 जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवलीत आयरे रोड उत्सवात राडा
navratri 2023 two groups clashed case registered against 23 people in ramnagar police station mumbai crime
navratri 2023 two groups clashed case registered against 23 people in ramnagar police station mumbai crimeSakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील जुना आयरे रोड येथे गावदेवी मंदिर आवारात उत्सवा दरम्यानच शुक्रवारी रात्री रक्तरंजित राडा झाला. देवीचे दर्शन घेऊन एक गट निघत असतानाच दुसऱ्या गटाने त्यांची वाट अडवली. यावेळी वाद होऊन पुढे त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दगड तसेच धारदार हत्याराने वार करत एका महिलेसह दोन ते तीन जणांवर या टोळक्याने वार केले.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सचिन केणे, नरेंद्र जाधव, गौरव जुळवे, अखिलेश धुरप उर्फ गब्बर वरूण शेट्टी, योगेश सुर्वे, नितीन यादव, गौरव फडके यांसह 15 जणांवर असे एकूण 23 जनांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात ओंकार भगत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात 4 ते 5 जण जखमी झाले असून यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

डोंबिवली पूर्वेतील जुना आयरे रोड येथील गावदेवी मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी गावातीलच दोन गट आपापसात भिडल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच येथील भगत गट व केणे गट या दोन्ही गटात वाद झाले असल्याने परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी ओंकार भगत हे त्यांच्या साथीदारासह गावदेवी मंदिर येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते.

त्यांचे दर्शन झाल्यानंतर वाटेतून जान्यावरून दोन्ही गटात पुन्हा वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट आपापसात भिडले यावेळी ठोश्या बुक्क्यांनी मारहाण तसेच दगड फेक, धारदार हत्यारांनी वार देखील करण्यात आले. यामध्ये एक महिलेसह तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

जमलेला जमाव आणि राडेबाजी पाहून दर्शनासाठी आलेले भाविक देखील बाहेर पळू लागले. या धावपळीचा फटका, ज्येष्ठ नागरिक, महिला लहान मुलांना बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात 8 जणांसह 10 ते 15 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.