चेन्नईत अपहरण, पालघरमध्ये जिवंत जाळले; नौसैनिक अधिकाऱ्याच्या हत्येमुळे पोलिसांनाही पडलं कोडं

navy (
navy (
Updated on

मुंबई- नौसैनिक सुरज कुमार यांच्या भयंकर हत्याप्रकरणाचे रहस्य अजून उलगडू शकलेले नाही. झारखंडचे रहिवाशी असणारे नौसैनिक सुरज कुमार दुबे यांचे अपहरण चेन्नईमधून झाले आणि त्यांची जिवंत जाळून हत्या पालघरच्या जंगलात झाली. नौसैनिकाच्या हत्येमुळे अनेकांना हैराण केले आहे. पोलिसांना या प्रकरणाचे रहस्य सोडवणे कोडे बनले आहे. सुरज यांनी ८ लाख रुपयांचे पर्सनल कर्ज घेतले होते. त्यांनी २८ ते २९ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये लावले होते. पण, सध्या त्यांच्या बँक अकाऊंटवर ३९२ रुपयेच दिसत आहेत.  

लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूची अटक ते केजरीवाल यांच्या मुलीची...

पालघर एसपी डीटी शिंदे यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची गुंतागुंत सोडवण्यासाठी १० टीम बनवण्यात आली आहे, ज्यात १०० पोलिस कर्मचारी आहेत. सुरज कुमार यांचे गावातील घर, चेन्नई ते मुंबई, नौसेना हॉस्पिटलच्या डॉक्टर अशा संबंधित लोकांची चौकशी केली जात आहेत. पोलिसांना अपहरण केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. पण, सुरजने मरण्याआधी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारीला त्यांनी सकाळी ८ वाजता रांचीतून विमान पकडले. त्यानंतर रात्री ९ वाजता ते चेन्नई एअरपोर्टवर उतरले.  एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर 3 अज्ञात लोकांनी बंदुक दाखवून त्यांना धमकी दिली. त्यानंतर त्यांचा मोबाईल हिस्कावून पांढऱ्या रंगाच्या SUV मध्ये त्यांना बसवण्यात आलं. त्यांना 10 लाखांची खंडणी मागण्यात आली आणि त्यांना 3 दिवस चेन्नईमध्ये कैद करण्यात आलं. 

5 फेब्रुवारीला त्यांना पालघरच्या घोलपवड तहसीलच्या जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जंगलात जळलेल्या अवस्थेत ते खूप काळ तडपडत राहिले. त्यानंतर गावकऱ्यांना याचा पता लागताच त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, सूरज 90 टक्के भाजले होते आणि त्यांची स्थिती बिकट होती. घोलवड पोलिसांनी 302, 307, 364(a), 392, 342 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

अजब प्रेमाची गजब गोष्ट; आपल्यापेक्षा 13 वर्ष लहान अभिनेत्याशी केलं लग्नं 

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सुरज यांच्याकडे ३ सिमकार्ड होते. त्यातील दोन मोबाईल क्रमांकाची घरच्यांना माहिती होती, तिसऱ्या क्रमांकाची माहिती नव्हती. यातील दोन क्रमांक ३० जानेवारीला बंद पडले. तिसरा क्रमांक सुरु होता आणि सुरज यांनी त्यावरुन १ जानेवारीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. या क्रमांकावरुन त्यांच्या बँक अकाऊंटची माहिती मिळाली आहे. त्यात कळालं की त्यांनी एका सहकार्याकडून ६ लाखांचे कर्ज घेतले होते. शिवाय ८ लाखांचे पर्सनल कर्ज होते. सूरज यांची नुकतंच लग्न ठरले होते. त्यांनी आपल्या सासऱ्याकडून ९ लाख रुपये घेतले होते. पण, त्यांच्या दोन बँक अकाऊंटकमध्ये एकूण ३९२ रुपये आढलले आहेत. सूरज यांच्या कार्डवरुन चेन्नई एटीएममधून ५ हजार रुपये काढण्यात आले होते. 

दरम्यान, सूरज यांच्या वडिलांनी आऱोप केलाय की त्यांच्या मुलाच्या हत्येसाठी त्याचा एक सहकारी जबाबदार आहे. त्याने सूरज यांना एका दिवसात १३ वेळा फोन कॉल केला होता. पालघर पोलिसांनी सांगितलंय की ते प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.