नौदलाला मिळाली पहिली P15B गाईडेड मिसाइल 'डिस्ट्रॉयर', आता होणार दमदार प्रहार

या 'डिस्ट्रॉयर'च्या डेकवरुन विमान विरोधी क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.
नौदलाला मिळाली पहिली P15B गाईडेड मिसाइल 'डिस्ट्रॉयर', आता होणार दमदार प्रहार
Updated on

मुंबई: भारतीय नौदलाची (India navy) ताकत आता आणखी वाढणार आहे. नौदलाला पहिली P15B स्टेल्थ गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर (destroyer) मिळाली आहे. माझगाव डॉकमध्ये या 'विनाशिके'ची निर्मिती करण्यात आली आहे. नौदलात याला 'डिस्ट्रॉयर' म्हणतात. युद्धनौकेचा हा एक प्रकार आहे. जानेवारी २०११ मध्ये प्रोजेक्ट 15B अंतर्गत अशा चार 'डिस्ट्रॉयर' निर्मितीच करार करण्यात आला होता.

विशाखापट्टणम वर्गातील या युद्धनौका आहेत. भारतीय नौदलाच्या इन हाऊस डिझाईन संस्थेने या विनाशिकेचे डिझाईन तयार केले. माझगाव डॉक शिपबिर्ल्डस लिमिटेडमध्ये ही युद्धनौका बांधण्यात आली आहे. विशाखापट्टणम असे या युद्धनौकेचे नाव आहे. या 'डिस्ट्रॉयर'च्या डेकवरुन विमान विरोधी क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.

नौदलाला मिळाली पहिली P15B गाईडेड मिसाइल 'डिस्ट्रॉयर', आता होणार दमदार प्रहार
पिक्चर अभी बाकी है कारण माझी एंट्री आता झालीय; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठिशी

'विशाखापट्टणम' ही प्रोजेक्ट 15B अंतर्गत बांधण्यात आलेली पहिली डिस्ट्रॉयर आहे. विशाखापट्टणम मुळे फक्त भारतीय नौदलाची ताकतच वाढणार नाहीय, तर आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने सुद्धा आपण अधिक सक्षम होणार आहोत. या युद्धजहाजावरील अस्त्रापासून ते अन्य टेक्नोलॉजी मध्ये स्वदेशीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.