Nawab Malik: नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका

Ncp News: नियमित जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Nawab Malik
Nawab Malik Newssakal
Updated on

Mumbai News: मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी  काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) निवडणूक लढवणारे आमदार नवाब मलिक  यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मलिक यांचा वैद्यकीय जामीन रद्द करण्यात यावा, तसेच त्यांचा नियमित जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ईडीने आर्थिक अफरातफरप्रकरणी फेब्रुवारी २०२२मध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. किडनी विकाराने त्रस्त असल्याने नवाब मलिक यांनी नियमित जामीन, तसेच वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिल्याने मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. त्यांना न्यायालयाने जानेवारी २०२४मध्ये तीन महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर केला.

Nawab Malik
Raj Thackeray : उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये म्हणून अनेकांची फिल्डिंग; निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या स्फोटक विधानाने खळबळ

त्यानंतर त्यात वाढ केली.दरम्यान, मलिक यांनी उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठी केलेली याचिका प्रलंबित आहे. जामिनाचा फायदा घेत नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)तर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच आक्षेप घेत सॅमसन पाथरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

‘नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला; मात्र मलिक यांनी गैरफायदा घेत अटींचा भंग केला आहे. निवडणुकीसाठी नवाब मलिक यांचा प्रचार पाहता त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने वैद्यकीय जामिनाची गरज नाही. त्यामुळे नियमित जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा,’ अशी विनंती याचिकेतून पाथरे यांनी केली आहे. न्यायालयात लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Nawab Malik
Nawab Malik : निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिकांना ईडीचा झटका ! ' हा' आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केली याचिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.