'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?

या नव्या फोटोचं कोणाशी काय आहे कनेक्शन?
'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?
Updated on

मुंबई: राज्य सरकारमधील मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी सध्या NCB मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. समीर वानखेडे यांच्या संदर्भात ते रोज नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिम असल्याचा त्यांचा दावा आहे, तर वानखेडे कुटुंबाने आपण हिंदूच आहोत, असे म्हटले आहे.

समीर वानखेडे यांच्या व्यक्तीगत जीवनाशी निगडीत अनेक बाबी समोर आणल्या आहेत. सर्वप्रथम त्यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या निकाह झाल्याचे समोर आणले. समीर वानखेडेंची पहिली पत्नी मुस्लिम होती. त्यानंतर त्यांनी आता समीर वानखेडेंचे जवळचे नातेवाईक, त्यांचा धर्म या बाबी समोर आणण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी त्यांनी समीर वानखेडेंच्या मेव्हण्याचा फोटो टि्वट केला होता. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?
1 November: आजपासून होणारे असे बदल ज्याचा थेट तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो परिणाम

आज पुन्हा एक नवाब मलिक यांनी फोटो टि्वट केला आहे. 'ये कौन हैं भाई' असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. त्यामुळे ही नवीन व्यक्ती कोण? आणि त्याचा काय संबंध? याची चर्चा सुरु झाली आहे. स्वत: नवाब मलिक आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मलिक सध्या दररोज अशा पत्रकार परिषदा घेऊन खुलासे करत आहेत.

'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?
नवा महिना, नवा दिवस कसा असेल शेअर बाजारासाठी?

रामदास आठवले काय म्हणाले....

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल समीर वानखेडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यांना पाठिंबा दिला. "मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे या दलित कर्तबगार अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. त्यांच्या जावयावर कारवाई केल्यामुळे नवाब मलिक समीर वानखेडेंवर चुकीचे आरोप करीत आहेत. असे खोटे आरोप करणे त्यांनी थांबवावे. ड्रग्स रोखण्याचे काम समीर वानखेडे करीत आहेत. क्रूझवर केलेली कारवाई योग्य आहे.मात्र ड्रग्स पार्टी रोखण्याचे काम करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या खाजगी आयुष्याची जाहीर चर्चा करून आरोपबाजी करणे अत्यंत चुकीचे आहे. ते नवाब मलिक यांनी थांबवावे" असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.