राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज? नवाब मलिक म्हणतात...

Uddhav
Uddhav
Updated on
Summary

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील भेटीनंतर चर्चांना उधाण

मुंबई: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बैठक (Meeting) झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माध्यमांमध्ये चर्चा (Discussion) आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर (Working Style) प्रश्न उपस्थित केले आहे असंही बोललं जात आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी खुलासा केला. (Nawab Malik squashes rumours about rift in NCP and CM Uddhav Thackeray)

Uddhav
P305 दुर्घटना: पाच कंपन्यांना समन्स, 10 जणांचे जबाब नोंदवले

"राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यावरून बैठक झाली असं जे चित्र उभे केले जातंय ती निव्वळ अफवा आहे. कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करतेय", असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. "पवारसाहेबांची व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसह लसीकरण, लॉकडाऊन व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. शिवाय पक्षाचे नेते शरद पवार यांना भेटतात तेव्हा राजकीय परिस्थितीवर मंत्र्यासोबत चर्चा करतात. तशीच ही भेट होती", असेही त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav
उद्धव ठाकरेंच्या नाराजीबद्दल सरकारने कळवलं का? - संजय राऊत

दरम्यान, देशात सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरही त्यांनी टीका केली. जगातील इंधनांचे दर कमी होत असताना देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र वाढत आहेत. या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली.

"जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे पंतप्रधान मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे. मोदींनी प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून ठेवले आहेत. पेट्रोलच्या भावाबद्दल २०१५ मध्ये भरभरून बोलणारे मोदी २०२१ मध्ये काहीच बोलत नाही. देशाचे पंतप्रधान २०१५मध्ये म्हणाले होते की माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. आता या दरांसाठी नक्की कुणाचं नशीब जबाबदार आहे? अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.