मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केसमधील नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यानं आपल्या सहकाऱ्यांसह कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. पण सध्या त्यांच्यावर झालेली बडतर्फीची कारवाई दुसऱ्या प्रकरणात झाली आहे.
याबाबत माहिती देताना एनसीबीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, विश्वविजय सिंह यांनी दुसऱ्या एका प्रकरणी तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. पण त्यांनी केलेल्या या तपासात काही त्रृटी आढळून आल्या होत्या. याबद्दल त्यांची एक वर्षापूर्वीपासून चौकशी देखील करण्यात येत होती. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर सेवेतून कायमची हाकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान, आर्यन खान प्रकरणात छापेमारी आणि तपास करणाऱ्या टीममधील समीर वानखेडे यांच्यावरही दुसऱ्या प्रकरणात आरोप झाले होते. तसेच आर्यन खान प्रकरणाचा तपासातही काही चुकीच्या गोष्टी आढळल्यानं वानखेडे यांची एनसीबीतून दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती.
वानखेडे आणि सिंह या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मुंबईहून गोव्याला निघालेलं क्रूझवर मुंबईतील बंदरात असतानाच छापेमारी केली होती. यावेळी १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रॉन, २१ ग्रॅम मारिजुना, २२ एमडीपीएच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख रक्कम असा माल जप्त केल्याचा दावा एनसीबीनं केला होता. यामध्ये आर्यन खानसह इतर १७ जणांना अटकही झाली होती. अनेक दिवस चाललेल्या हाय व्होलटेज ड्राम्यानंतर आर्यन खानची हायकोर्टानं जामीनावर मुक्तता केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.