जाणून घ्या समीर वानखेडेंची संपत्ती, कुठे किती एकर जमीन, किती फ्लॅट

समीर वानखेडे यांच्या एकूण संपत्तीची (Property) माहिती सुद्धा समोर आली आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSakal
Updated on

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे NCB चे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) सध्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) दररोज गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असून ते उंची कपडे, घड्याळे वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. या आरोपांना वानखेडे कुटुंबीयांनी उत्तर दिलं आहे. पण त्याचवेळी समीर वानखेडे यांच्या एकूण संपत्तीची (Property) माहिती सुद्धा समोर आली आहे.

समीर वानखेडे यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती संबधित विभागासमोर नियमानुसार सादर करतात.

त्यांच्या मालमत्तेची यादी

- समीर वानखेडे यांच्याकडे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात 4 एकर जमीन आहे (ही मालमत्ता त्यांच्या वडिलोपार्जित मालकीची आहे.)

- 2004 मध्ये वानखेडेची आई जाहीदा वानखेडे यांनी समीर वानखडे यांना (मुंबईत) यांच्या नावे 800 चौरस फुटांचे घर दिले.

- आई जाहिदा वानखेडे यांच्या नावावर एक फ्लॅट नवी मुंबईत आहे, जो 1999 साली घेतला होता. (हा फ्लॅट सुमारे 700 चौरस फूट आहे)

Sameer Wankhede
T20 WC : अफगाणिस्तानच्या गोलंदाजाकडून टीम इंडियाला वॉर्निंग

- समीरच्या मावशीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता, त्यांना मुलबाळ नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचे सुमारे 1000 चौरस फुटांचे अंधेरीतील कार्यालय समीर वानखेडे (मुंबईत) यांना दिले.

- नवी मुंबईत एक भूखंड आहे जो भाड्याने देण्यात आला आहे, हा भूखंड 1995 मध्ये घेण्यात आला असून तो सुमारे 1100 चौरस फूट आहे.

Sameer Wankhede
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ‘एसआयए’ स्थापण्यास परवानगी

- समीर वानखेडे यांनी 2016 मध्ये सुमारे 1100 चौरस फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट घेण्यासाठी पैसे कुठून आले? क्रांती रेडकर यांनी त्यांचा म्हाडाचा फ्लॅट विकला. वडिलांच्या पेन्शनचे पैसे आईच्या मृत्यूनंतर एलआयसीचे पैसे मिळाले आणि 2016 ते 2021 पर्यंतच्या पगाराचा काही भाग.

- याशिवाय नवाब मलिक यांनी सांगितलेले घड्याळ (सीमास्टर) त्यांच्या आईने 2005 साली सुमारे 55000 रुपयांना विकत घेतले आणि समीर वानखेडे यांना भेट म्हणून दिले. त्यावेळी समीर वानखेडे यांची पहिली सरकारी नोकरी केंद्रीय पोलीस संघटनेची होती.

- शूज आणि कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर, ही सर्व खरेदी अंधेरी लोखंडवालाच्या सामान्य दुकानातून झाली आहे.

कोण होत्या जाहिदा वानखेडे?

- जाहिदा वानखेडे या समीर वानखेडे यांच्या आई आहेत. ज्यांचे 2015 मध्ये निधन झाले, जाहिदा एक व्यापारी होत्या आणि त्यांचा भंगार व्यापाराचा व्यवसाय होता.

- समीर वानखडेच्या आईची आई दुर्गा यांच्या नावाने एक एनजीओ होती तसेच याशिवाय त्या अनाथालय ही चालवत होत्या

- समीर वानखेडेंचे आजोबा म्हणजेच के जाहिदा वानखेडे यांचे वडील हरियाणातील मुरथल येथील आहेत आणि ते सुद्धा राजघराण्यातील होते, आणि समीर वानखेडे यांची आजी सुरतची आहे, ती देखील खूप श्रीमंत कुटुंबातील होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.