मुंबई: चीनच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसल्यास त्या भेकड कृत्याचा सूड घेण्याची हीच वेळ आहे, 56 इंच छाती दाखविण्याची हीच वेळ आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
लडाख मधील गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रीमती चाकणकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचवेळी स्वदेशीचा नारा देत त्याच्या विसंग वर्तन करणाऱ्या पंतप्रधानांच्या कृतीवरही त्यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून चीनला 18 वेळा म्हणजे सरासरी वर्षाला तीनवेळा जावून आले आहेत. इतक्या चकरा मारुन त्यांनी काय मिळवले, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत या मुद्याला पुढे करताना 'व्होकल फॉर लोकल'ची संकल्पना पंतप्रधान मोदी जनतेसमोर मांडत आहेत. तरीही काही दिवसांपूर्वी दिल्ली- मेरठ मेट्रोच्या कामात एलअँडटी या भारतीय कंपनीला डावलून चीनच्या 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीला हे काम का दिले, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
असे असेल तर स्वदेशीचा नारा का देण्यात येत आहे. एकीकडे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चीनविरोधात भारतीयांच्या भावना चेतवण्यासाठी चिनी मालावर बहिष्काराचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. तर दुसरीकडे चिनी कंपन्यांनाच भारतातील मोठमोठी कामे द्यायची ही देशाची फसवणुक आहे, असेही त्यांनी दाखवून दिले आहे.
कोणावरही स्वतःहून हल्ला न करण्याची भारताची परंपरा असली तरी कोणी हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची धमक भारतात आहे. हे दाखवून चीनच्या कृत्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही चाकणकर यांनी मोदी यांना सांगितले आहे.
NCP criticizes narendra modi on china issue
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.