NCP Meeting: भाजपचा तीव्र विरोध असूनही तो आमदार अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित; महायुतीत खडाजंगीची शक्यता!

Ajit Pawar Meeting Nawab Malik present: अजित पवारांनी मंगळवारी रात्री देवगिरीवर नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी नवाब मलिक उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई- राज्यात ११ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण, ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अजित पवार गटाकडूनही यासाठी तयार सुरू आहे. अजित पवारांनी मंगळवारी रात्री देवगिरीवर नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी नवाब मलिक उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नबाव मलिक उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मलिकांनी बैठकीला हजेरी लावली असल्याने महायुतीमध्ये खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काहीकाळ तटस्थ भूमिका घेतली होती. पण, त्यानंतर त्यांनी अजित पवार गटाशी जवळीक दाखवली होती.

Ajit Pawar
Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

देवेंद्र फडणवीसांचे पत्र

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट पत्र लिहिलं होतं. त्यांनी नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशाला विरोध दर्शवला होता. याबाबत फडणवीसांनी अत्यंत स्पष्टपणे अजित पवार गटाला भाजपची भूमिका सांगितली होती. असे असताना नवाब मलिकांनी अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून यावर आक्षेप घेतला जातो का हे पाहावं लागणार आहे.

Ajit Pawar
Vidhanparishad Election News: अजित पवार शब्द खरा करणार? खासदारकीची संधी हुकलेल्या तरूण नेत्याला देणार विधान परिषदेची उमेदवारी

देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल्यानंतर नवाब मलिक पुन्हा एकदा अज्ञातवासात गेले होते. अजित पवार गटाने देखील मलिक यांच्याशी संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण, आता पुन्हा नवाब मलिक यांनी अजित पवार गटात अस्तित्व दाखवलं आहे. महत्त्वाच्या बैठकीला मलिकांनी उघडउघड हजेरी लावली आहे. त्यामुळे या घडामोडीचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com