'आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायल्यासारखा बोलतो...'; छगन भुजबळांचा जरांगेंवर बोचरा वार

मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथे ओबीसी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मराठ्यांना आरक्षणाला विरोध नसल्याचा पुनर्उच्चार केला.
chhagan bhujbal
chhagan bhujbal
Updated on

मुंबई- मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथे ओबीसी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नसल्याचा पुनर्उच्चार केला. तसेच मी आयुष्यात कधी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. माझ्या मुलांनी कधी लाभ घेतला नाही. पुढेही मी कधीही आरक्षणाचा लाभ घेणार नाही, असं ते म्हणाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी घेऊन इतर जातींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदी सरकारने जे आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यातील ८५ टक्के जागांचा लाभ मराठ्यांनी घेतला आहे. सारथीला मोठ्या प्रमाणात मदत केली जातीये, पण ओबीसींना मदत केली जात नाहीये. हा भेदभाव मंजूर नाही. धनगर समाजाला योजनेची मदत जाहीर करुन अद्याप मदत मिळालेली नाही. त्यांना जे देताय ते आम्हालाही द्या हीच आमची मागणी आहे, असं भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal
Manoj Jarange Patil : फडणवीस, अजित पवारांना ‘तो’ संपवू शकतो; छगन भुजबळ यांच्यावर टीका

लोकसेवा आयोगात ए ग्रेड मध्ये ३३ टक्के मराठा आहे, बी ग्रेड सेवांमध्ये १९ टक्के, सी ग्रेडमध्ये ३८ टक्के आणि डी ग्रेडमध्ये ३६ टक्के मराठा समूदायाचे लोक आहेत. मंत्रालयात सुद्धा ५४ टक्के मराठा समाज आहे. १६ टक्के आयएएस मराठा आणि २८ टक्के आयपीएस मराठा आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी आकडेवारी सादर केली.

भुजबळांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली. जरांगे काहीही बोलतो. आमची लायकी काढतो. एक म्हण आहे. आधीच मर्कट आणि त्याच्यात मद्य प्याला. काहीही बोलतोय. आमची लायकी काढणारा तू कोण, अशी घणाघाती टीका भुजबळांनी केली. मनोज जरांगे पाटील सासरची भाकरी खातात, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.

chhagan bhujbal
Chhagan Bhujbal: "मला गोळी मारली जाईल"; छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा दावा, पोलिसांचा दाखवला रिपोर्ट

जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मराठा समाज म्हणून लिहिला जात नाही, तर मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो. त्याच्यामध्ये सर्वजण होते. सर्व जातीजमातीचे लोक होते, असं भुजबळ म्हणाले. काही विशिष्ठ लोकांना गावबंदी होत आहे. एका महिला सरपंचाला गावबंदी करण्यात आली, त्यांना शिविगाळ करण्यात आली असा आरोप त्यांनी केलाय.

जरांगे मला काय पाहणार आहे. आधी तुमची तब्येत सांभाळा. तुमची बेवडा पिऊन-पिऊन किडनी खराब झाली. खुलेपणाने दादागिरी दिली जातेय. अजिबात सहन केलं जाणार नाही. सरकार आणखी किती त्यांच्यासमोर झुकणार आहेत. महात्मा गांधींसमोर ज्याप्रमाणे व्हाईसरॉय झुकायचे तशाप्रकारचा आता प्रकार सुरु आहे. लोकशाहीची थट्टा सुरु आहे, असं भुजबळ म्हणाले.

आपला पक्ष बाजूला ठेवा. ओबीसी म्हणून सर्व एकत्र या. आज सर्वजण त्याला सलाम करायला जातात. जे जे लोक ओबीसींवर टीका करताहेत त्यांना लक्षात ठेवा. त्यांचा पुढच्या निवडणुकीत कार्यक्रम करा. ओबीसींना जागं करा आणि लढायला तयार रहा, असं आवाहन भुजबळांनी केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.