'ऑपरेशन कमळ' वर शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले...

'ऑपरेशन कमळ' वर शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले...
Updated on

मुंबई- कर्नाटक,  मध्यप्रदेशापाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून वारंवार सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या ऑपरेशन कमळची शक्यता फेटाळून लावली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत राज्यातील राजकारण आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य केले.  यावेळी इतर राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन कमळ राज्यात होईल का यावर पवारांनी परखड मत व्यक्त केलं.

ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निवडून दिलेली सरकारं दुबळी करणं. डिस्टॅबिलाईज करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं' असा थेट पलटवार केंद्र सरकारवर केला.

महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असं सातत्याने पसरवलं जातंय, असा शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की,  हो पहिल्यांदा त्यांनी तीन महिन्यात सांगत होते. आता सरकारला सहा महिने झाले. त्यानंतर सप्टेंबरचा वायदा आहे, काही लोक ऑक्टोबर महिन्याचा वायदाही करत आहेत. मात्र मला खात्री आहे की पाच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या राज्याचा कारभार करेल. ऑपरेशन कमळ असो किंवा आणखी काही असो याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरेंच्या सरकारवर होणार नाही. 

संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान 

हे मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे. कोणताही मुहूर्त काढा, आमचं सरकार 5 वर्ष चालेल, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे. सरकार पाडणार... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असं थेट आव्हान राऊतांनी विरोधकांना दिलं आहे. 

तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असंही राऊत विरोधकांना म्हणालेत. मध्यप्रदेशापाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमध्ये तशा हालचाली सुरु झाल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपला राज्यातलं सरकार पाडण्याचं थेट आव्हानच दिलं.

काय म्हणाले राऊत 

काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असं काही तरी सरकार पडणार असल्याचं बोलत असतात. बरं त्यांचा हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक नाही आहे . त्यांनी जर मुहूर्त काढला असेल तर आमचीही गटारी आहेच की. आम्ही कोकणातील लोक आहोत, गटारी कशी असते दाखवून देऊ. हे महाराष्ट्र आहे. हे काही गोवा आणि मध्यप्रदेश नाही, असं थेट टोला राऊतांनी भाजपला लगावला. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले की,   तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स महाराष्ट्रात चालणार नाही. तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू. मग रोज सतत पाच वर्षे तुम्हाला मुहूर्तच काढावा लागेल, असंही ते म्हणालेत.

ncp leader sharad pawar bjp operation lotus maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.