मुंबई : मुंबईतून आजही मोठ्या राजकीय घडामोडी समोर येतायत. कालच्या शरद पवारांच्या पार्थ पवारांबाबत व्यक्त केलेल्या मतानंतर आजच्या राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आज सकाळी छगन भुजबळ यांचीही पार्थ पवारांबाबत आपलं मत मांडलं. पार्थ पवारांबाबत बोलताना 'नया हैं वह' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती.
काल 'सिल्व्हर ओक'वर चर्चा...
कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवार स्वतः शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे या देखील तिथं उपस्थित होत्या असं समजतंय. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मंत्रालयात गेलेल्या आहेत. काल अजित पवार यांनी सिल्व्हर ओक वर जाणं आणि आज सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेणं याला पार्थ पवारांच्या विषयी शरद पवारांनी केलेल्या विधानाची पार्श्वभूमी असू शकते असं राजकीय विश्लेषक म्हणतायत.
सकाळपासून अजित पवार मंत्रालयात
आज सकाळपासून अजित पवार मंत्रालयात आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांची कामं सुरु आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे या देखील अनेकदा मंत्रालयात जात असतात. आज सुप्रिया सुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील अजित पवारांच्या कार्यालयात गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळेच राजकीय परिघात पुन्हा एकदा चर्चा रंगताना पाहायला मिळतायत.
'ती' पार्श्वभूमी नाही
आज सकाळपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या यशवंतराव चव्हाणमध्ये होते. तिथे काम संपवून आता सुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांना भेटायला गेल्यात. दरम्यान, आताच्या सुप्रिया सुळे यांच्या अजित पवारांसोबतच्या बैठकीला पार्थ पवारांबाबच्या वक्तव्याची पार्श्वभूमी नसल्याची माहिती समोर येतेय.
ncp mp supriya sule reached matralaya to meet ajit pawar important political update
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.