"अरेरे! भाजपचा आधी इतरांवर दबदबा होता अन् आता..."

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उडवली खिल्ली
Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या भाजप (BJP) विरूद्ध ठाकरे सरकार (MVA Govt) असा सामना रंगला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नवाब मलिक (NCP Nawab Malik) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपाविरोधात आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. भाजपचे (BJP) सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी डिलीट केलेलं ट्वीट (Tweet) आणि केंद्रीय मंत्री यांनी केलेलं वक्तव्य मागे घेणं या दोन गोष्टींवरून मलिक यांनी भाजपची खिल्ली (Criticism) उडवली. भाजपचा पूर्वी इतर पक्षाच्या नेत्यांवर दबदबा होता, पण आता तर त्यांना आपल्याच नेत्यांवर दबाव (Pressure) टाकावा लागतोय, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले. (NCP Nawab Malik angry over Pm Modi Rulings Subramaniam Swami Nitin Gadkari)

Narendra Modi
कोरोना टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरांना मारहाण

भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता, दबदबा होता. परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी डिलीट केलेलं ट्वीट आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. भाजपच्या या नीतीवर नवाब मलिक यांनी प्रहार केला.

Narendra Modi
"बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर..."; भाजपचा सवाल

गुजरातला ज्याप्रमाणे १ हजार कोटी दिले तसेच नुकसान झालेल्या राज्यांना विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांना आर्थिक मदत देण्याचं ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. या आधी नितीन गडकरी यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. ट्वीट डिलीट होत आहेत. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेताहेत. याचाच अर्थ त्यांना अंतर्गत बोलण्याचा अधिकार नाही हे यातून सिद्ध झाले आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.