Nawab Malik Released from Jail: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची अखेर गेल्या १७ महिन्यांनंतर सुटका झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळं सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांसाठी तत्पुरता जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली असून वाजत-गाजत जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. (NCP Nawab Malik sanctioned bail on Medical purpose and released from jail)
पीएमएलए केसमध्ये सुप्रीम कोर्टानं त्यांना तीन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. पण शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असल्यानं त्यांची आज सुटका झाली. जामिनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सीटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नवाब मलिक हे सध्या मुंबईतील सीटी केअर रुग्णालयात किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. प्रकृती ढासाळत असल्याचं सांगत मलिकांनी अनेकदा जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता पण त्यांचा जामीन फेटाळण्यात येत होता. पण यावेळी त्यांच्या जामिनाला ईडीनं विरोध केला नाही, त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला. (Latest Marathi News)
दरम्यान, जामिनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिक यांना रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. १७ महिन्यांनंतर म्हणजेच दीड वर्षानंतर नेत्याचं दर्शन होत असल्यानं कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात त्यांचंस्वागत केलं. (Marathi Tajya Batmya)
मलिकांची आज सुटका होणार असल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या दुपारपासूनच सीटी केअर रुग्णालयाबाहेर उपस्थित होत्या. त्याचबरोबर अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील यावेळी नवाब मलिकांच्या स्वागतासाठी हजर आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून मलिकांचं स्वागत करण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.