Rohit Pawar: लोकांमध्ये संभ्रम आहे, पण...; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar
Rohit Pawaresakal
Updated on

NCP Rohit Pawar said about Sharad Pawar

मुंबई- तीस वर्ष एकमेकांच्या विरोधात असणारे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात थोडा संभ्रम तर असणार, असं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. शिवसेना तीस वर्ष काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात होती. पण, मराठी अस्मितेसाठी लढणारा आणि देशाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख होती. अनेकवेळा शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली. पुढे तीस वर्षांनी आम्ही एक झालो, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या प्रमुख इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडी तयार केली. ३० वर्षानंतर हे पक्ष एक झालेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा संभ्रम असणारच, पण सगळे नेते लोकांमध्ये जातील तेव्हा सर्व संभ्रम दूर होईल. एकमेकांशी चर्चा केल्यानं प्रश्न नक्की सुटेल. शरद पवार १७ ऑगस्टला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, असं पवार म्हणाले.

Rohit Pawar
Rahul Gandhi : आदिवासींना जंगलांमध्येच ठेवण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपवर टीका

विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्व जागांवरच दावा केला जातो. हे प्रत्येक वेळेस होत असतं. त्यावर चर्चा होते, मग मधला मार्ग निघतो. त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची काही गरज नाही. प्रत्येक पक्षाची जास्तीत जागा मिळण्याची इच्छा असते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही विधानसभेत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण, भाजपला हरवण्यासाठी त्यांनीही आघाडीसोबत यावं, असं ते म्हणाले

Rohit Pawar
Sanjay Raut : सत्तेच्या बळावर सरकार पाडणे देशद्रोहच - संजय राऊत

भाजपमध्ये सामिल झालेल्या एका मंत्र्याने वक्तव्य केलं. त्याच्यामध्ये अहंकार आणि भीती दिसत होती. लोक आपल्यासोबत आहेत का नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा नेत्यात भीती निर्माण होते. शरद पवारांना माहितीये लोक त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ते न भीता लोकांमध्ये जाताहेत, त्यांचा विश्वास संपादन करत आहेत, असं ते म्हणाले. लोक महत्वाचे आहेत. त्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. लोकांमध्ये गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न कळणार नाहीत, त्यांचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. त्यामुळे शरद पवार लोकांमध्ये जात आहे, असंही पवार म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.