शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवर शिवसेनेचा नेता म्हणतो...

पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती
Sharad-Pawar-Devendra-Fadnavis
Sharad-Pawar-Devendra-FadnavisTwitter
Updated on
Summary

पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी गुप्त भेट (Secret Meeting) झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दिसल्या. ती भेट नक्की झाली की नाही, याबद्दल अद्यापही स्पष्टता नाही. तशातच सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवार यांच्या घेतलेल्या भेटीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. फडणवीस 'सिल्वर ओक'वर (Silver Oak) जाऊन शरद पवार यांना भेटले. तसेच, आपल्या भेटीचा एक फोटो (Photo) पोस्ट करत फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. पण राजकीय वर्तुळात या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले. या भेटीवर शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. (NCP Sharad Pawar BJP Devendra Fadnavis Meeting Shivsena Eknath Shinde Reaction)

Sharad-Pawar-Devendra-Fadnavis
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा विसर?

"शरद पवार हे देशातील एक मोठे नेते आहेत. काही दिवस त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या. सध्या ते आजारातून बाहेर आले आहेत आणि तंदुरूस्त होत आहे. त्यांचे मार्गदर्शन महाविकास आघाडीला आणि नेत्यांने सातत्याने मिळतंय. ते केवळ एका पक्षाचे किंवा राज्याचे नेते नसून संपूर्ण देशाचे नेते आहेत आणि त्यामुळेच त्यांना कधीही कोणताही नेता भेटू शकतो", अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.

मेट्रोच्या कार्यक्रमात अनिल परबांच्या अनुपस्थितीबद्दल...

"आजचा कार्यक्रम हा मुंबई मेट्रोशी संबंधित होता. या कार्यक्रमाला आवश्यक असणारे सगळे मंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. काही लोक महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत. आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या सर्व गोष्टींची नक्कीच शहानिशा केली जाईल. त्यांच्यावर आरोप करण्यात आले असले तरी त्याबद्दलचा कुठलाही पुरावा नाही. त्यांमुळे खोटे आरोप करू नये असं माझं विरोधकांना सांगणं आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Sharad-Pawar-Devendra-Fadnavis
'आयत्या बिळावर नागोबा', ठाकरेंचा निषेध; भाजप आमदाराला अटक

विकासकामांमध्ये राजकारण नको...

"मेट्रोचा प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. ट्रायल रनची पाहणी करण्यात राजकारण करणे आवश्यक नाही. प्रकल्प हे लोकांच्या हितासाठी आहेत. लोकांच्या विकासासाठी असलेल्या प्रोजेक्टमध्ये राजकारण करू नये", अशी विनंती त्यांनी केली.

Sharad-Pawar-Devendra-Fadnavis
"मोदींनी पेट्रोल डिझेलवरील अन्याय दूर केला"; काँग्रेसचा टोला

मराठा, ओबीसी आरक्षणाबद्दल...

"SEBC मध्ये आरक्षण दिलं. EWS चा फायदा मराठा समाजाला मिळतोय. या पूर्वीही आरक्षण मिळालं होतं. आरक्षण टिकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करत आहे. दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत राज्य सरकार प्रयत्न करणार. केंद्र सरकारची मदत मिळवून देण्यासाठी विरोधकांनीदेखील पुढे आलं पाहिजे", अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.