ED raided on Nawab Malik House : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणानंतर भाजपसह (BJP) केंद्रावर हल्लाबोल केला आहे. या सर्वामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून हल्लाबोल केला आहे. (Union Minister Raosaheb Danve On Malik Case)
दानवे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला मंत्रीमंडळात गुन्हेगारी मंत्री नसावा असे वाटत असेल तर, त्यांनी नवाब मलिकचा तात्काळ राजीनामा द्यावा असा सल्ला दिला आहे. तसेच राष्ट्रवादी नवाब मलिकला पाठिंबा देऊन मलिकांचे नव्हे तर, दाऊद इब्राहिम टोळीचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मलिकांच्या अटकेनंतर घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे मत ममता यांनी व्यक्त केले असून, या मुद्द्यावर स्वतः राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना दिले आहे.
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात जवळपास 10 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी अनेकदा म्हटले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या मुंबईतील घरी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. दरम्यान, अटकेनंतर मी लढेन, घाबरणार नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.