पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!

पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!
पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!
Updated on

नवी मुंबई : सानपाडा सेक्‍टर- 20 जवळील पाम बीचलगतच्या नाल्याजवळ मंगळवारी (ता.11) सकाळी मगरीचे दर्शन झाले. यापूर्वीही जानेवारी महिन्यात या परिसरात मगर आढळल्याचे सांगण्यात येत आहे. 

जवळपास दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात जुईनगरच्या या नाल्यात मगर आल्याचे सांगितले जात होते. याशिवाय अनेकदा जुईनगरच्या रेल्वे रुळाखालील नाल्यामध्ये देखील स्थानिकांना मगरीचे दर्शन झाले होते. त्यातच मंगळवारी सानपाडा सेक्‍टर- 20 जवळील पाम बीच लगतच्या नाल्याजवळ स्थानिक मनोज भोईर व त्यांच्या साथीदारांना मोठी, वजनदार मगर आढळली. नाल्याजवळ ती शांतपणे पहुडलेली होती. मात्र, हालचाल जाणवताच ती तेथून चपळाईने नाल्यात शिरली. 

याबाबत स्थानिक मनोज भोईर यांनी सांगितले की, सकाळी साडेदहाच्या सुमारास नाल्याजवळ मगर दिसली. मागे जानेवारीतही जुईनगरजवळ मगर आढळली होती. मात्र, त्या मगरीपेक्षा मंगळवारी दिसलेली मगर खूपच मोठी आहे. जुईनगर स्थानकापासून सानपाडा डी-मार्ट येथून निघणारा नाला वळण घेऊन खाडीत जातो. येथे 2 मगरी असाव्यात असा अंदाज आहे. या नाल्यात म्हशी, डुकरे पाहण्यास मिळतात. परंतु म्हशींवर तेथील मगरी कधी हल्ला करत नाहीत. डुकरे, नाल्याजवळ असलेली कुत्रे, पिल्लांना ते आपले भक्ष्य करत आहेत. गावातील काही नागरिक मासेमारीसाठी जातात; मात्र त्यांनाही कधी उपद्रव झालेला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. 

कोल्हा, खवल्या मांजराचाही वावर 
याविषयी सानपाडा येथील स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख अजय पवार यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला. मिलेनिअम पार्क, रेल्वे कारशेडजवळ नाल्यात अधून-मधून मगर दिसत असल्याचे त्यांनीही नमूद केले. गेल्याच आठवड्यात पाम बीचजवळ दुचाकीला धडकून कोल्हा जखमी झाल्याचे आढळले होते. त्यापूर्वी वाशीलगतच्या खारफुटीत खवल्या मांजरही दिसले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.