Mumbai Accident: मेट्रोचा प्रचंड निष्काळजीपणा! मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू; मुंबईच्या अंधेरी पूर्वमधील घटना

Mumbai Andheri East accident : Seepz कंपनीच्या समोर मेट्रो लाइन - 3 चा काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रेनेजचे झाकण खुले होते. ही महिला चालत असताना ड्रेनेजमध्ये पडली अन् वाहून गेली.
manhole
manhole
Updated on

Mumbai Accident: उघड्या चेंबरमधून नाल्यात पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व सिप्स परिसरातील ही घटना आहे. Seepz कंपनीच्या समोर मेट्रो लाइन - 3 चा काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रेनेजचे झाकण खुले होते. ही महिला चालत असताना ड्रेनेजमध्ये पडली अन् वाहून गेली.

मेट्रो कडून काम केल्यानंतर रस्त्याच्या मधला डिव्हायडरमध्ये ढाकण टाकला गेला नव्हता. ही ड्रेनेज लाईन उघडी होती. संध्याकाळी दहाच्या सुमारास एक महिला Seepz कंपनीमधून बाहेर येऊन रस्ता क्रॉस करत असताना नाल्यात पडली. रस्त्याच्या मधला डिव्हायडरवर ड्रेनेज लाईन उघडी असल्यामुळे महिला खाली पडली.

manhole
Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

महिला नाल्यातून शंभर ते दीडशे मीटर दूर अंतरापर्यंत वाहून गेली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस सोबत मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. तब्बल एक तास सर्च ऑपरेशन राबवून महिलेला अग्निशमन दलाचा जवानांनी बाहेर काढले.

manhole
Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

मेट्रो तीन लाईनचा पाच तारखेला उद्घाटन होणार आहे. मात्र या उद्घाटना आधी मेट्रोच्या चुकीमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला आहे. मेट्रो कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विमल अप्पाशा गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबई मेट्रो तीनचे काम काही फूट अंतरावर सुरू असल्यामुळे या मेनहोलचे झाकण काढण्यात आले होते. रस्त्यावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे महिलेने रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडर वरून जाण्याचा प्रयत्न केला असता महिला झाकण नसलेल्या मेन हॉलमध्ये पडून वाहून गेली आणि त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. यानंतर आता महापालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू झाले आहे.

मुंबईमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. वीज कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पावसामुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या पावसाने उसंत घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.