कर्जत : मागील चार महिन्यांत नेरळ शहरात (Robbery in neral) एकामागोमाग एक असे वारंवार घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. नेरळ पोलिसांना (Neral Police) अखेर या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात (Thief arrested) यश आले आहे. त्याच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल (Property recovered) हस्तगत करण्यात आला.
नेरळ शहरातील निर्माण नगरी, मोडकनगर, बाजारपेठ, शेलू, ममदापूर आणि टेपआळी परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. या चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अशा प्रकारचे १० गुन्हे नेरळ पोलिस दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यांचा तपास पोलिस सहायक निरीक्षक सचिन गावडे, श्रीकांत काळे, गुन्हे प्रकटीकरण कक्ष नेरळ यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला.
सीसी टीव्ही चित्रिकरण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करीत असताना त्यांनी १६ ठिकाणची पडताळणी केली. त्यांतून गोपनीय माहिती मिळवून शेलू, धामोते, साईमंदिर, नेरळ बाजारपेठ याठिकाणी शोध गुन्ह्यातील आरोपी जय बाळकृष्ण राजाध्यक्ष उर्फ रोशन बाळ जाधव (३०) याला नेरळ बाजारपेठमध्ये रात्री सापळा रचून अटक केली. सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. जाधव हा आधारवाडी कारागृहातून ४५ दिवसांच्या कोविड रजेवर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.