मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी खासगी एजन्सीला ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय रद्द केला. त्याचप्रमाणे महापालिकेने त्यांचे ३४ टि्वटर हॅण्डल (Twitter handle) हाताळण्यासाठी वर्षाला २ कोटी रुपये खर्च करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी महापालिकेतील (BMC) नेत्यांनी केली आहे. @mybmc आणि अन्य ३३ टि्वटर हॅण्डलचा रिच आणि कितपत परिणाम होतोय, याचे कुठलेही तांत्रिक विश्लेषण होत नाहीय, असा आरोप आमदार आणि नगरसेवकांनी केला आहे. (Netas slam BMC over 34 Twitter handles Rs 2 crore per year cost to run them)
काही टि्वटर हॅण्डल व्हेरीफाईड सुद्धा नाहीयत. नव्या एजन्सीची नियुक्ती करण्याची मागणी आमदार-नगरसेवकांकडून होतेय. जुलै २०१९ मध्ये BMC ने कुठल्याही निविदा प्रक्रियेशिवाय जुलै २०२२ पर्यंत ३४ टि्वटर अकाऊंट हॅण्डल करण्यासाठी S2 इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला ५.८ कोटी रुपयाचे कंत्राट दिले. हे टि्वटर अकाऊंट हाताळण्यासाठी ३५ जणांचा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला. यामध्ये डिझायनर्स आणि कंटेट क्रिएटर्स आहेत.
महापालिकेचे उपक्रम आणि सेवांची माहिती देण्यासाठी, जागरुकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येतो. त्यासाठी स्थायी समितीची परवानगी घेण्यात आलीय, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. "टि्वटरवर बीएमसीची सक्रीयता, नियमित संवाद आणि तक्रारींची घेतली जाणारी दखल, यामुळे जुलै २०१९ मध्ये टि्वटरवर BMC च्या फॉलोअर्सची संख्या ३५ हजार होती. ती आता पाच लाखाच्या वर आहे, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी नागरिकांनी टि्वटरवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले होते. शंका उपस्थित केल्या होत्या" असे चहल यांनी सांगितले.
"सोशल मीडिया व्यवस्थापक आणि डिजिटल पीआरसाठी BMC ने मार्च महिन्यात टेंडर काढले होते. पण अपग्रेडसाठी ऑनलाइन सिस्टिम बंद असल्यामुळे १० जून ते पाच जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. निविदा प्रक्रियेतूनच नवीन एजन्सी निवडण्यात येईल" असे चहल म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.