मुंबई : राज्यातील कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतेय. अशात राज्यात पुन्हा भीषण परिस्थिती ओढावू नये म्हणून राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येतील असं वक्तव्य महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून आज नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार कसे असतील कोरोनाबाबतचे नियम जाणून घेऊयात :
सर्व सिनेमा हॉल (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स), हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेवर सुरु राहतील .
> मास्क नसणार्यांना परवानगी देता येणार नाही
> सदर आस्थापनांमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाची टेम्परेचर तपासणी होणं अनिवार्य
> सदर आस्थापनांमध्ये जागोजागी सॅटिटायझरची सोय असावी
> सदर आस्थापनांची नियमांचे काटेकोर पालन करावे
सर्व मॉल्समध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळले जावेत
> मास्क नसणार्यांना मॉलमध्ये परवानगी देता येणार नाही
> मॉलमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाची टेम्परेचर तपासणी होणं अनिवार्य
> मॉलमध्ये जागोजागी सॅटिटायझरची सोय असावी
> मॉलमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे
राज्यात सार्वजनिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील
लग्नसमारंभात केवळ ५० जणांनाच परवानगी राहील, नियमांचे पालन झाले नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल
अंत्य संस्कारासाठी केवळ २० नागरिकांनाच परवानगी
अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य यंत्रणांशी निगडित सेवा वगळता सर्व कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्केच उपस्थिती असावी. अधिकाधिक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे.
new corona guideline issued by government of maharashtra in the state read all points
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.