डोंबिवलीतील नवा फूटओव्हर ब्रिज काढतोय नागरिकांचा जीव, सोयीपेक्षा गैरसोय जास्त?

डोंबिवलीतील नवा फूटओव्हर ब्रिज काढतोय नागरिकांचा जीव, सोयीपेक्षा गैरसोय जास्त?
Updated on

मुंबईः मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात नव्यानं बांधलेल्या फूटओव्हर ब्रिजचा प्रवाशांना त्रास होत आहे. प्रवाशांनी हा ब्रिज खूप उंच असल्याची तक्रार केली आहे. या ब्रिजच्या पायऱ्या खूप उंच असल्याचं रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे चढताना त्रास होतो. तसंच वृद्ध लोकांनाही हा ब्रिज सोयीस्कर नसल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे. 

डोंबिवली स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी एक नवा फूटओव्हर ब्रिज बांधण्यात आला. मात्र हा ब्रिज प्रवाशांचा घाम गाळतोय.  या ब्रिजवरुन चालणं फारच कठिण आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ते धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचंही काही प्रवाशांचं म्हणणं आहे. प्रवासी संघटना भारतीय रेल यात्रीने प्रथम रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास जाणून घेतला आणि त्यानंतर त्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकला. त्यानंतर या ब्रिजला अभियांत्रिकी आपत्ती असं संबोधलं आहे. आता नागरिकही या ब्रिजच्या बांधणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ब्रिजच्या बांधकामात काही त्रुटी नाही आहेत. स्थान आणि जागेच्या अडचणींमुळे तसा त्रास होत आहे ते लवकरच निश्चित करण्यात येईल. या ब्रिजवरील पायऱ्या या जवळपास शिडीसारख्या आहेत. त्यामुळे या ब्रिजवरुन जाताना सावधगिरी बाळगा, असं एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशांना आवाहन केलं आहे. 

तर पंकज एस जोशी यांनी म्हटलं की, वृद्ध व्यक्तींसाठी हा ब्रिज धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे डोंबिवलीकरांनी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित करावा. तर पंकज जयस्वाल सांगतात की, हा ब्रिज बनवण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला. या ब्रिजवरुन वृद्ध प्रवास करु शकत नाही. दोन वर्ष घेऊनही ब्रिजच्या बांधकामात त्रुटी आढळून आल्या आहेत. 

या ब्रिजवरुन पहिल्यांदा जात असलेले प्रणय सावंत म्हणाले की, लॉकडाऊननंतर मी पहिल्यांदा या ब्रिजवरुन प्रवास केला. या ब्रिजवरुन चालताना सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचं आहे. गर्दीच्या वेळी किंवा ताणतणावात या ब्रिजवरुन चालताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, या गैरसोयीचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करताहेत. हा ब्रिजच्या पायऱ्या थेट मुख्य रस्त्याशी कनेक्ट आहेत. त्यामुळे पायऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात या ब्रिज येथील जागेची अडचण देखील आहे. आता मध्यभागी एक अतिरिक्त रेलिंग प्रदान केली जाईल. त्याचा वापर सहजतेनं करता येईल, असं मुंबई विभागातील वरिष्ठ अभियंतानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.