मुंबई : नव्या वर्षात मध्य रेल्वेवरील (central railway) 9.44 किमी ठाणे-दिवा (thane-diva railway rout) पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याद्वारे सुमारे 80 लोकल फेऱ्या वाढतील. यासह मेल, एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्गिका (separate rout for express) तयार झाल्याने लोकलचा वक्तशीरपणा वाढतील. यासह नेरळ-माथेरान या 21 किमी लांबीच्या टॉय ट्रेनमध्ये (Neral-Matheran toy train) संथ आणि रेंगाळणारा प्रवास जलद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांची आकर्षक माथेरान राणी नव्या वर्षात वेगात धावेल. मध्य रेल्वे टेकडीवरील स्थानकावर पहिल्यांदाच नॅरोगेज मार्ग (Narrow gauge rout) तयार करून नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा प्रवास तीन तासांवरून दोन तासांत किंवा त्याहूनही कमी तासांत होण्यास मदत होईल. त्यामुळे नव्या वर्षात प्रवाशांचा प्रवास वेळेत आणि वेगात होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (New railway facilities for railway commuters in new year 2022)
ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका 2022 मध्ये पूर्ण होणार आहे, असा दावा मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशनद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन महिन्यात या महत्वपूर्ण मार्गिकेचे काम सुद्धा पूर्ण होणार आहे. या नव्या मार्गिकेवर जवळ जवळ 80 लोकल फेऱ्या वाढणार आहे. यामुळे लोकल ट्रेनवर येणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा ताण कमी होणार आहे. तर, नेरळ-माथेरान प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांचे अपग्रेडेशनसाठी 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिकेचे काम वेगात सुरू असून या प्रकल्पामुळे जादा लोकल फेऱ्या, स्वतंत्र एक्स्प्रेस मार्ग तयार होईल.
नव्या वर्षात हे होणार
- अधिक पादचारी पूल, लिफ्ट आणि एस्केलेटरची सोय
- अधिक एसी लोकल सेवा
- डेक्कन क्वीन एक्सप्रेस नवीन एलएचबी रेकसह धावणार
- जोगेश्वरी टर्मिनस लवकरच पूर्णत्वास येणार
- पर्यटन विकासाला रेल्वेचा बूस्टर दिला जाणार
- पाॅड हाॅटेल, रेस्टाॅरंट ऑन व्हिलची संख्या वाढणार
सरत्या वर्षात 6 दशलक्ष टन मालाची वाहतूक
कोरोना आणि लाॅकडाऊन काळात देशभरात रेल्वेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा केला जात आहे. रेल्वेद्वारे सामान्य आवश्यक वस्तुंसह, औषधे, ऑपरेशनसाठी लागणारी साधे यांची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वे डिसेंबर 2021 मध्ये सर्वोत्तम मालवाहतूक साध्य करेल अशी शक्यता आहे. डिसेंबर 2021 मध्ये आतापर्यंत 6 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. वर्ष 2021 मध्ये जानेवारी ते डिसेंबर किसान रेलच्या 770 ट्रिप धावल्या तर किसान रेलची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 886 ट्रिप चालवण्यात आल्या आहेत.
राजधानी एक्स्प्रेसचा वाढला वेग
चाळीसगाव - धुळे विभागावर मेमू सेवांना प्रारंभ झाला आहेत. तर, 2021 मध्ये मध्य रेल्वेने 12 रेक (6 ट्रेनचे) एलएचबी रेकमध्ये रूपांतरित केले. 1हजार 54 फेऱ्यासाठी 166 अतिरिक्त डबे (वातानुकुलीत 3 टियर, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास) विविध गाड्यांना जोडले गेले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सणाच्या सुट्ट्या दरम्यान विविध प्रसंगी 1 हजार 742 विशेष गाड्या धावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आला.
यूटीएस मोबाईल अॅप सुरु
- कोरोना काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा होती. त्यामुळे यूटीएस मोबाईल अॅप सेवा बंद होती. मात्र, आता कोविड लसीचे दोन डोस घेणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे आता लसंवत प्रवासी यूटीएस मोबाईल अॅप वरूनच थेट तिकीट काढू शकणार आहेत. मात्र यासाठी प्रवाशांना नियमानुसार कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. नोव्हेंबर 2021 पासून ही सुविधा खुली केली आहे. दरम्यान युनिव्हर्सल पास दाखवून जसं रेल्वे तिकीट ऑफलाईन उपलब्ध होत असतं तसेच आता ते ऑनलाईन देखील उपलब्ध होणार आहे.
रेल्वेने 2021 मध्ये केलेले काम
- सीएसएमटी येथे नवीन थीम-आधारित रंगीत फलक लावले.
- कोपर आणि अंबरनाथ स्थानकावर नवीन होम प्लॅटफॉर्मची निर्मिती
- पादचारी पूल 2021 या वर्षात 13 एफओबी प्रदान करण्यात आले
- मध्य रेल्वेवर एकूण 319 पादचारी पूल
- मध्य रेल्वेवरील एकूण 125 सरकते जिने
- मुंबई विभागात 5 दुहेरी सरकते जिने प्रदान
- मध्य रेल्वेवर एकूण 86 लिफ्ट्सची संख्या
- वाय-फाय सुविधेमध्ये मध्य रेल्वेवरील आता 379 स्थानके समाविष्ट आहेत.
- गुरु तेग बहादूर नगर आणि एलटीटी येथे नवीन शौचालये
- सीएसएमटी आणि एलटीटी येथे दृष्टिहीनांसाठी ब्रेल स्पर्श नकाशा
- मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई डेक्कन क्वीनमध्ये विस्टाडोम कोच
- स्थानकांवरील सामान्य माहितीसाठी यात्री अँप
- सीएसएमटी येथे डिजिटल क्लोक रूम, हर्बल गार्डन, एक्झिक्युटिव्ह वेटिंग लाउंज
प्रवासी सुरक्षेत वाढ
- आत्तापर्यंत मध्य रेल्वेचा मुंबई विभागातील 3 हजार 450 स्थानकांसह मध्य रेल्वेवर एकूण 4 हजार 687 सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले.
- 37 लोकल गाड्यांच्या 200 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
- उपनगरीय महिला प्रवाशांसाठी स्मार्ट सहेली अँप
- एकट्याने प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या महिला प्रवाशांसाठी मेरी सहेली अँप
- रेल्वे पूर मदत पथक पाण्यावर चालवता येण्याजोग्या मोटार बोटीसह मोक्याच्या ठिकाणी स्थापित
- कल्याण येथे नवीन रोड ओव्हर ब्रिज बांधण्यात आला.
- हँकॉक रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर्स लाँच करण्यात आले.
- मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड येथे मायक्रो बोगदा पद्धतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जलमार्ग वाढवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.