लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु होणार?

लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु होणार?
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना म्हणजेच नियमावली सरकारनं जाहीर केली. यात रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग करण्यात आले. ही नियमावली राज्यभरात 22 मे रोजी म्हणजेच आजपासून लागू झाली आहे. राज्यात आजपासून दोनच झोन असतील. ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. रेड आणि नॉन रेड झोन असे दोनच झोन अस्तित्वात असतील. नव्या नियमानुसार संपूर्ण राज्यात संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

हे आहेत रेड झोन 

रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका आहेत. तर महाराष्ट्राचा उर्वरित भाग बिगर रेड झोन क्षेत्रात येईल. 

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर आणि इतर भाग हा एमएमआर क्षेत्राअंतर्गत या महापालिका येतात. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असणार आहेत.

आजपासून मुंबईत कसा असेल रेड झोन 

पुढील गोष्टींना सर्वच झोनमध्ये बंदी कायम

  • डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
  • मेट्रोसेवा बंद राहणार
  • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
  • हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार.
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
  • 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये
  • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
  • सर्व खासगी कार्यालये बंदच राहणार
  • सलून, ब्युटी पार्लर आणि सौंदर्यप्रसाधन निगडीत सेवा

बाजारपेठा सकाळी 9 ते सायं.5 पर्यंत खुल्या 

रेड झोनमध्ये उघडण्यास बंदी असलेली दुकाने, मॉल, आस्थापना केवळ स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती किंवा पावसाळ्याच्या पूर्वीच्या कामांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडता येतील. मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते. निर्मिती किंवा व्यावसायिक वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे. 

रेड झोन असलेल्या मुंबईत आजपासून या गोष्टी सुरु होणार

  • केवळ अत्यावश्यक सेवेची सर्व सुरु राहणार.
  • इतर दुकानांना परवानगी देण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येईल.
  • स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारुची दुकाने सुरु करता येईल. किंवा दारुची होम डिलिव्हरी करता येणार आहे.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट यांची केवळ होम डिलिव्हरी उपलब्ध असेल.
  • बँक, कुरिअर, पोस्ट सेवा सुरु असणार.
  • टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहतील.
  • चारचाकी वाहनामध्ये  3 जण असाच प्रवास करु शकणार आहेत
  • दुचाकीवर केवळ एकालाच परवानगी देण्यात आली आहे.
  • दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरु करण्याची परवानगी दिली आहे.
  • विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.
  • आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स डिलिव्हरी करण्यास मुभा आहे.
  • केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील उपहारगृहे, पोलिस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन सेंटर यांच्यासाठी असलेली उपहारगृहे सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. 
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध
  • सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क घालणे अनिवार्य
  • लग्नात 50 पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही
  • अंतिम संस्कारात 50 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी नाही
  • दारु, पान, गुटखा यांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास मज्जाव
  • प्रत्येक दुकानात ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर आवश्यक आणि कमाल पाच ग्राहक मर्यादा
  • प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाण आणि वाहतुकीवेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य
  • लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार.

रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन असा असेल

नियमावली लक्षात घेऊन संबंधित महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसंच कंटेन्मेंट झोन निश्चित करतील. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना कंटेन्मेंट झोनविषयी निर्णयाचे अधिकार देण्यात आलेत. कंटेन्मेंट झोनमध्ये एखादी वसाहत, झोपडपट्टी, इमारत, मोहल्ला, इमारतींचा संकुल, गल्ली, वॉर्ड, पोलीस स्टेशनचा भाग, गाव किंवा गावाचा भाग यांचा समावेश होऊ शकतो. त्यापेक्षा मोठा विभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यापूर्वी (संपूर्ण तालुका किंवा महापालिका क्षेत्र) मुख्य सचिवांशी चर्चा करणे बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येणार आहे.

new rules of lockdown four these this will be open from today read full news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.