ताम्हिणी घाटात पालीची नवी प्रजाती

‘हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस’ नामकरण
New Species
New SpeciesSakal
Updated on

मुंबई : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटामधील वन्यजीव अभयारण्यामधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. ‘हेमिडॅक्टिलस’ कुळातील ही पाल या परिसराला प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिचे नामकरण ‘हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस’ असे केले आहे. भारतात सापडणाऱ्या ‘हेमिडॅक्टिलस’ कुळातील मोठ्या पालींमधील ‘हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस’ची भर पडली आहे. या संशोधनामुळे नव्यानेच संरक्षणाचा दर्जा मिळालेल्या ‘ताम्हिणी वन्यजीव अभयारण्या’च्या संरक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे.

New Species
कोरोनाच्या चाचण्या आणि रुग्णांचे प्रमाण 'या' महिन्यात एक टक्क्यांवर

सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधतेमध्ये पालीच्या नव्या प्रजातीची भर पडली आहे. उत्तर सह्याद्रीमध्ये ४९.६२ चौरस किमी परिसरात विस्तारलेल्या ‘ताम्हिणी अभयारण्या’मध्ये पालीची नवी प्रजात सापडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दशकभरात उभयचरांविषयी काम करणाऱ्या संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ सारख्या संस्था या दुर्लक्षित असलेल्या जीवांवर संशोधनाचे काम करत आहेत. याच संस्थेतील संशोधक अक्षय खांडेकर, तेजस उद्धव ठाकरे आणि इशान अग्रवाल यांनी ‘ताम्हिणी अभयारण्या’मधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या ‘झूटॅक्सा’ या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित केले. ही नवी प्रजात ‘हेमिडॅक्टिलस’ या पोटजातीमधील असून, यामध्ये भारतात सुमारे ४६ प्रकारच्या पाली सापडतात.

New Species
भिक्षेकरी समाजातील एकमेव "शिक्षित"

२०१९ साली ताम्हिणी घाटामधील सर्वेक्षणादरम्यान ही पाल या संशोधकांना आढळून आली होती. २००८ साली उलगडलेल्या ‘हेमिडॅक्टिलस आरोनबाउरी’ या पालीशी ती साधर्म्य साधत असल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष झाले होते; मात्र ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मधील संशोधकांनी या पालीची डीएनए आणि आकारशास्त्राचे आधारे तपासणी केली. त्या वेळी ही पाल ‘हेमिडॅक्टिलस आरोनबाउरी’ या पालीपेक्षा वेगळी असून, ती विज्ञानाकरिता नवीन असल्याची माहिती त्यांना मिळाली. भारतामध्ये ‘हेमिडॅक्टिलस’ कुळात सापडणाऱ्या दोन मोठ्या पालींमध्ये तिचा समावेश झाला आहे. ताम्हिणी घाटामधील बेसाल्ट खडकावर या पालीचा प्रामुख्याने अधिवास असल्याची माहिती संशोधक अक्षय खांडेकर यांनी दिली. या संशोधनाच्या सर्वेक्षणासाठी स्वप्नील पवार, सतपाल गंगलमाले आणि पराग चौधरी यांनी मदत केली आहे.

New Species
नागोठणे ग्रामपंचायतीवर 'रुग्णवाहिका चालकाच्या' हस्ते ध्वजारोहण

अशी आहे पाल

निशाचर असून, तिचा रंग मातेरी आहे

आकार १२६ मिलिमीटर एवढा आहे

खडकावर आढळणारे कीटक, इतर पाली प्रमुख खाद्य

सामान्य भाषेत तिचे नाव ‘बेसाल्ट जायन्ट गेको’ किंवा ‘ताम्हिणी जायन्ट गेको’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.