सेक्स-प्रूफ मेक-अप; आता 'त्या' क्षणांनंतरही तुमचा मेक-अप राहील तसाच..

सेक्स-प्रूफ मेक-अप; आता 'त्या' क्षणांनंतरही तुमचा मेक-अप राहील तसाच..
Updated on

मुंबई - आपण छान दिसावं म्हणून अनेक महिला आणि मुली कायम मेक-अपचा आधार घेत असतात. अशात मार्केटमध्ये मेक-अपची दररोज नवनवी उत्पादने येत असतात. तरुण महिला आणि मुलींमध्ये ही नवनवी उत्पादने वापरून पहिला देखील आवडतं. कुठल्याही मॉलमध्ये जा किंवा अगदी स्टेशनच्या आसपास असलेली दुकानं, अगदी प्रत्येक दुकानांनमध्ये अनोखी सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध असतात. याचबरोबर हल्ली सौंदर्य प्रसाधनं ऑनलाईन खरेदीकरण्याचं प्रमाण देखील प्रचंड वाढलंय.

अशात वॉटर-प्रूफ, सम्ज-प्रूफ किंवा डस्ट-प्रूफ असे अनेक मेक-अपचे प्रकार आणि उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आता यामध्ये आणखी एका आणि जरा हटके मेक-अपची भर पडली आहे. त्याच नाव आहे सेक्स-प्रूफ मेकअप. होय सध्या महिला आणि तरुणी मोठ्या प्रमाणात सेक्स-प्रूफ मेक-अपला पसंती देतायत. दरवर्षी मेकअपचे नवनवे ट्रेंड येतात, अनेक महिला मुली त्यांच्याकडे आकर्षित होत असतात.  अशातच आता सेक्स-प्रूफ मेक-अप भलताच फेमस झालाय. 

जाणून घेऊयात नक्की काय आहे सेक्सप्रूफ मेकअप  

सध्या सेक्स-प्रूफ मेकअपची भलतीच डिमांड आहे. अनेक महिला आणि मुली सेक्स-प्रूफ मेकअप वापरणं पसंत करतात. हा सेक्स प्रूफ मेक-अप म्हणजे सेक्स सेशन झाल्यानंतर देखील तसाच राहणारा मेक-अप होय. हा मेकअप खराब होत नाही किंवा बेडशीटवर कोणतेच डाग देखील सोडत नाही. म्हणूनच या सेक्स-प्रूफ मेकअपची भलतीच डिमांड आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार हिक्स कॉस्मॅटिक कंपनीने सेक्स प्रूफ मेकअपची नवीन रेंज बाजारात आणली आहे. हा मेकअप जेल, पावडर आणि पेस्ट स्वरूपात उपलब्ध आहे. खासकरून महिला एस्कॉर्टससाठी हा मेक-अप बनवण्यात आलाय. मात्र, आता हा मेक-अप सर्व महिलांच्या पसंतीला पडताना पाहायला मिळतोय.  

जगभरातील महिलांची सेक्स-प्रूफ मेकअपला पसंती

जगभरातील महिला आणि युवतींचा आकर्षण ठरणाऱ्या या मेक-अपमध्ये २५ वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पादने आहेत. यामध्ये लिपस्टिक, आयलायनर, आयशॅडो अशी विविध उत्पादने आहेत. हा मेक-अप कुठलाच डाग सोडत नसल्याने हा मेकअप भलताच फेमस झालाय. त्यामुळेच आता हिक्स कॉस्मॅटिक कंपनीने अमेरीकेत लॉस अँजेलिस आणि कॅलिफोर्नियामध्ये देखील आपली दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. 

new trend in makeup industry know about s3x proof makeup 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()