Mumbai Crime : तस्करीचा नवा ट्रेण्ड पोस्ट टपालद्वारे युरोपीय देशातून अमली पदार्थाची तस्करी... DRI कारवाईत माहिती उघड

आरोपीने नेदरलॅण्डमधून अशा प्रकारे तीन वेळा अंमलीपदार्थ मागवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न
new trend of drug smuggling from European Countries post Information Revealed DRI Action
new trend of drug smuggling from European Countries post Information Revealed DRI Actionsakal
Updated on

मुंबई : युरोपमधील नेदरलॅण्ड देशातून टपालामार्फत एमडीएमए अंमलीपदार्थ ऑर्डर करणाऱ्या दोघांना सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. आरोपीने नेदरलॅण्डमधून अशा प्रकारे तीन वेळा अंमलीपदार्थ मागवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

समद उमाटिया व दानिश शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघेही जोगेश्वरी पश्चिम परिसरात वास्तव्यास आहेत.याप्रकरणी 95 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात नेदरलॅण्ड येथून आलेले 1 पाकीट 5 जून रोजी सीमाशुल्क विभागाने जप्त केले होते. तपासणी केली असता त्यात 95 ग्रॅम एमडीएमए सापडले. हे पाकिट जोगेश्वरी पश्चिम येथील कमील शेख याच्या नावाने आले होते.

new trend of drug smuggling from European Countries post Information Revealed DRI Action
Pune News : आठ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

या पत्त्यावर जाऊन तपासणी केली असता तेथे कमील शेख राहत नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी टपालावर नमुद केलेल्या मोबाइल क्रमांकावरून शेखशी संपर्क साधला. त्याने समद उमाटियाला टपाल पाठवल्याचे सांगितले. उमाटियाला ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी दानिश शेखला अटक करण्यात आली.

new trend of drug smuggling from European Countries post Information Revealed DRI Action
PCMC Crime News : फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराचा लाकडी दांडक्याने मारून खून

दोघांविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नेदरलॅण्डवरून टपालाद्वारे नियमित अंमलीपदार्थ मागवत असल्याचे चौकशीत उघड झाले. याप्रकरणी 95 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.