मुंबई : नव्याने दाखल होणारे निवासी डॉक्टर आणि विशेष वैद्यकीय अधिकारी (एसएमओ) यांना भरमसाठ मानधन मिळत असल्याने पालिकेच्या मुख्य रुग्णालयातील जुन्या डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर आहे. वर्षानुवर्षे रुग्णालयांत काम करून देखील कोरोना काळात मानधन वाढ मिळत नसून मानधन वाढवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी पत्र देखील लिहिले आहे.
पालिकेच्या मुख्य रुग्णालयात अधिष्ठात्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (एएमओ)कार्यरत असतात. दिवसपाळीसह रात्रपाळी, रुग्णांच्या समस्या यावर लक्ष ठेवण्याचे काम हे अधिकारी करतात. हे अधिकारी आपल्या जुन्याच मानधनावर काम करत आहेत.मात्र नवीन येत असलेल्या डॉक्टरांना एक लाखांहुन अधिकचे मानधन देण्यात येत असल्याने या डॉक्टरांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एएमओंसह, असिस्टंट प्रोफेसर यांच्या मानधनात वाढ होत नसून नवीन आलेल्या शिकवू डॉक्टर आणि एसएमओ यांना भरसाठ मानधन देण्यात आले आहे. मात्र 10- 12 वर्ष रुग्णसेवेत घालवली असताना त्यांना मानधन मात्र कमी मिळत आहे. आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत सर्व डॉक्टरांनी या आशयाचे निवेदन पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, रुग्णालय प्रशासन यांना दिले. मात्र हे निवेदन लाल फितीत अडकले असून आश्वासना पलीकडे या डॉक्टरांना काहीही मिळाले नाही असे एका एएमओ ने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.
कामावर असताना रुग्णालयांची जबाबदारी, वाढीव काम एमओंनाच करावे लागते. तर दुसरीकडे विशेष वैद्यकीय अधिकारी कोणतेही वाढीव जबाबदारी नसते. पालिकेचे कर्मचारी पालिकेच्या वसाहतीत राहत असल्याने त्यांना त्याचे भाडे मोजावे लागते, तर हे विद्यार्थी असल्याने त्यांना भाडे द्यावे लागत नाही. तरीदेखील मुख्य पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधन वाढीचा विचार पालिकेकडून करण्यात यावा. आणि नवीन डॉक्टरच्या तुलनेत आम्हाला मानधन द्यावे अशी मागणी सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय आहे.
------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.