कोरोना आणि विविध रक्तगट, कुणाला आहे सर्वाधिक धोका? नवीन संशोधन म्हणतंय...

कोरोना आणि विविध रक्तगट, कुणाला आहे सर्वाधिक धोका? नवीन संशोधन म्हणतंय...
Updated on

मुंबई - देशात अनलॉक ०१ आणि महाराष्ट्रात मिशन बिगिन जरी सुरु झालं असलं तरीही कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. अशात जागतिक पातळीवर महाविनाशकारी कोरोनावर औषध किंवा लस तयार करण्याचे शर्थीचे प्रयन्त सुरु आहेत. साधारण कोणतीही लस तयार करण्यासाठी काही वर्ष वेळ लागतो असं संशोधक सांगतात. मात्र कोरोनावर जगभरात संशोधन सुरु असल्याने लवकरच आपल्याला लस मिळेल असं देखील संशोधक सांगतायत. हे संशोधन करत असताना काही महत्त्वाच्या बाबी आता समोर येतायत. यामध्ये आता एक नवीन संशोधन समोर येतंय. भारतात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने याबाबत माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.  

कोरोना हा रेस्पेरेटरी डिसीज असल्याने त्याचा थेट परिणाम हा आपल्या फुफ्फुसांवर आणि अनुषंगाने आपल्या श्वसनावर होतो. न्यू मेडिकल लाइफ सायन्स वेबसाइटनं याबाबत एक संशोधन केलंय. त्यांनी १६०० रुग्णांचा अभ्यास केला. या संशोधनाअंती एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला. ज्यामध्ये A+ रक्तगट असलेल्या रुग्णांना श्वसनाचा त्रास जास्त होतो असं समोर आलं. मात्र O+ रुग्णांमध्ये हा धोका कमी असल्याचं समोर आलं. जीन्सच्या आधारे केलेल्या संशोधनात  A + रक्तगट असलेल्या रुग्णांना श्वसनाचा जास्त त्रास होता आणि त्यामुळे त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं संशोधक सांगतात. 

दरम्यान चीनच्या वूहान आणि शेन्झेन प्रांतात देखील असंच संशोधन करण्यात आलं होतं. यामध्ये २१७३ कोरोना बाधितांवर संशोषण करण्यात आलेलं. त्यामध्ये देखील हाच निष्कर्ष समोर आला होता.  A ब्लडग्रुपच्या रुग्णांना मृत्यूचा धोका जास्त तर O रक्तगट असलेल्या रुग्णांना मृत्यूचा धोका कमी असल्याचं समोर आलेलं. ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशा नागरिकांच्या देखील रक्तगटांवर सध्या संशोधन सुरु आहे. 

कोरोनामुळे जगभरातील 66 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेतीन लाखांपेक्षा अधिकांचा यामुळे जीव गेलाय. भारतातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या २ लाख २७ हजारांवर आहे. दुर्दैवाने भारतात यामधील ६ हजार ३०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

news research on covid 19 and various blood groups by new medical life science

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.