मुंबईतील पुढचा कोविड पिक येईल तो आधीपेक्षा कमी असेल, TIFRचं संशोधन

मुंबईतील पुढचा कोविड पिक येईल तो आधीपेक्षा कमी असेल, TIFRचं संशोधन
Updated on

मुंबई: मुंबईतील कोविडच्या दुसऱ्या टप्प्याची तीव्रता पहिल्यापेक्षा कमी असेल असे टीआयएफआर म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

टीआयएफआरच्या म्हणण्यानुसार, मुंबईत जर दुसऱ्या ट्प्प्यातील कोविडचा उद्रेक झालाच तर ती परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. रुग्णसंख्या जरी वाढली तरी त्यामुळे खूप जास्त नुकसान होणार नाही. शहर पूर्णपणे खुले झाले तर 1 जानेवारीपर्यंत रुग्णालयात रुग्णसंख्या वाढू शकते असे ही या अभ्यासातून समोर आले आहे. 

ऑक्टोबर 26 पर्यंत केलेल्या निरिक्षणानुसार, जानेवारी 2021 पर्यंत मुंबईतील जनता व्हायरसच्या संपर्कात येऊन 80 टक्के झोपडपट्टीतील लोकांमध्ये कमी जास्त प्रमाणात आणि 55 टक्के झोपडपट्टी न राहणाऱ्या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल.

तंत्रशिक्षण संस्था आणि कॉम्प्युटर सायन्स टीआयएफआरचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले की, गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्ण संख्या जशी वाढली तशीच ती दिवाळीनंतर ही वाढलेली पाहायला मिळेल. मात्र, त्याचे प्रमाण तुलनेत कमी असेल. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईकर या व्हायरसच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात तेवढ्याच प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असावी. 

1 नोव्हेंबरपासून जर सर्व गोष्टी खुल्या केल्या तर मृत्यू दर दिवसाला किमान 20 ते 30 असा असेल आणि जर 1 जानेवारीपर्यंत जर सर्व खुले केले गेले तर दिवसाला 4 ते 20 एवढे मृत्यू होतील. 

जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत लस उपलब्ध होऊन मुंबईतील 50 वर्षावरील 29.3 लाख लोकांना लस दिली तर मृत्यू दर 64 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. आताच्या तुलनेत पुढच्या सहा महिन्यात मृत्यूच्या दरात ही कमतरता होऊन हा आकडा 950 हून 340 वर जाऊन पोहचेल. रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत ही घट होऊन पुढच्या सहा महिन्यात हे प्रमाण जवळपास 67 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Next Covid Infection Mumbai will be less than before evidenced by TIFR research

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.