मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने आज सकाळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (pradeep sharma) यांच्या अंधेरीतील निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. मन्सुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात प्रदीप शर्मांची एनआयएने याआधी चौकशी केली होती. (NIA raid on encounter specialist pradeep sharma home bjp leader reaction)
दोन दिवसांपूर्वीच एनआयएन या प्रकरणात दोघांना अटक केली होती. एका आरोपीला लातूरमधून अटक केली होती. त्यानंतर आता थेट प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारीची कारवाई केली आहे. सचिन वाझे प्रमाणे प्रदीप शर्मा शिवसेनेशी संबंधित आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवली होती.
भाजपा नेत्यांनी काय म्हटल?
प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या छापेमारीच्या कारवाईवर भाजपा नेत्यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "हे अपेक्षितच होतं. सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मा हे मार्गदर्शक होते, हे सर्वश्रृत होतं. त्यामुळे अँटिलिया, मन्सुख हिरेन प्रकरणात वाझेंच्या मागे शर्मांचा हात असल्याचा संशय होता. एनआयएचे धागेदोरे शर्मा यांच्यापर्यंत पोहोचणारच होते. शर्मा आणि वाझे यांचे ज्या पद्धतीचे संबंध होते. त्यातून निश्चितच धागेदोरे एनआयएच्या हाती लागतील" असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या छापेमारीच्या मुद्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात शिवसेनेवर प्रहार केला आहे. "आधी शिवसेनेचा प्रवक्ता वाझे जेलमध्ये गेला आणि आता शिवसेनेचे उपनेते, उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार. सध्या हे मन्सुख प्रकरणात जेलमध्ये जात आहेत. सचिन वाझेने चौकशीत अनिल परब यांचे नाव घेतले होते. आज प्रदीप शर्माच्या घरी कारवाई सुरु आहे. कधी न कधी अनिल परब यांच्या निवासस्थानी सुद्धा अशाच तपास यंत्रणा पोहोचणार" असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
"उद्धव ठाकरेंची माफीया टोळी एकापाठोपाठएक जेलमध्ये जाणार. अनिल परबचा दापोली रिसॉर्ट घोटाळा मी समोर आणला. या अनिल परब यांचा रिसॉर्टमधील पार्टनर आहे सदानंद कदम. कांदिवलीतील शिवसेनेचा शाखाप्रमुख या सदानंद कदमचा पार्टनर आहे. त्या शाखाप्रमुखाने मन्सुखला मारण्यासाठी आपली प्राडो गाडी सचिन वाझे आणि प्रदीप शर्माला दिली" असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.