मुंबई : राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून (ATS) राज्यभरात ४४ ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
यामध्ये घाटकोपर ट्रेन ब्लास्टमधील साकीब नाचन आणि त्याचा मुलगा शामिन नाचन या दोघांना ताब्यत घेण्यात आलं आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. तसेच अटकेतील इतर संशयितांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. यामुळं मोठा कट उधळण्यात आला आहे. (NIA Raids in Maharashra Karnataka Ghatkopar train blast accused arrested Bomb materials seized)
दोन बाईक चोरांना अटक
सुत्रांच्या माहितीनुसार, या कारवाईत इसिसचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-पुण्यात दोन बाईक चोरांना अटक करण्यात आली होती. यातून इसिसच्या नेटवर्कबाबत खुलासा झाला होता, त्यानंतर पुणे पोलिसांनी हा तपास एटीएसकडं दिला होता. त्यानंतर या प्रकरणाची व्यक्ती खूपच मोठी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडं देण्यात आलं होतं. (Latest Marathi News)
इसिसचं नेटवर्क उद्ध्वस्त करणार
यानंतर आता इसिसचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी एनआयएनं पुढाकार घेतला असून आज पहाटेपासून मुंबई-पुण्यासह, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भायंदर तसेच कर्नाटकात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. यामध्ये कर्नाटकातून १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भायंदरमध्ये १ अशा ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तसेच यामध्ये १५ हून अधिक संशयीत दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)
बॉम्बस्फोटांसाठी लागणार साहित्य जप्त
या संशयितांकडून बॉम्बस्फोटांसाठी लागणारं साहित्य, कागदपत्रे, बेहिशोबी रोकड, बंदूक, इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळं स्फोटाचा मोठा कटही उधळण्यात आला आहे. या सर्व संशयीत आरोपींना मुंबईतील पेडर रोड इथल्या एनआयएच्या कार्यालयात आणण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.