मुंबई, ता. 20 : इंग्लडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर राज्य सरकारसह महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कोविडच्या अगदीच्या सुरवातीच्या काळात झालेल्या चुका परत होऊ नयेत यांची खबरदारी घेतली जातेय. 1 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. यातून धडा घेत आता नव्या कोविडशी लढण्यासाठी सर्वच यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत.
‘फेब्रुवारी मार्च काळात परदेशातून 2 लाख प्रवासी मुंबईत आले. त्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला. त्यामुळे आता खबरदारी घेत आहोत’ असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. पुढे चहल म्हणालेत की, रात्रीचा कर्फ्यू म्हणजे लॉकडाऊन नाही. अत्यावश्यक सेवांवर कोणातही परीणाम होणार नाही. पाचपेक्षा जास्त माणसांना जमण्यासाठी परवानगी नाही. नागरीकांनी घाबरुन जाऊ नये.
महत्त्वाची बातमी : मराठा विद्यार्थ्यांना EWSचा आधार, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबईसह भारतातील सर्व विमानतळावर 18 जानेवारी 2020 पासून चिन तसेच त्या परीसरातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत होती. त्यात टप्प्याटप्प्याने काही देशांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, 9 मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटूंब आखाती देशातून आले हाेत. तर, मुंबईत आढळेला पहिला रुग्णही याच प्रवाशांबराेबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनींग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली गेली होती. तसेच काही प्रवासी परदेशातून इतर देशांमध्ये जाऊन नंतर मुंबई विमानतळावर येत होते.
दरम्यान, सुरवातीला झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आता शासनाकडून खबरदारी बाळगण्यात येतेय. त्यामुळे इंग्लडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर राज्य सरकारसह महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
( संपादन - सुमित बागुल )
night curfew in mumabi for next fifteen days know all details and code of conducts
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.