मुंबईत लवकरच नाईट क्लब बंद करणार?, पालकमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबईत लवकरच नाईट क्लब बंद करणार?, पालकमंत्र्यांनी दिले संकेत
Updated on

मुंबई:  राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं काढलं आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. तसंच नाईट क्लब लवकर बंद होण्याची शक्यता मुंबईत आहे, असंही ते सांगायला विसरले नाहीत. 

 अनेक नाईट क्लब हे उशिरापर्यंत सुरु असतात. त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच नाईट क्लब बंद होण्याची शक्यता आहे. मुंबईत अशाच केसेस वाढल्या की लॉकडाऊनबाबतही निर्णय होऊ शकतो, अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली आहे.

चौपाटी, गेट वे ऑफ इंडियाला जातात अशा ठिकाणी गर्दी होताना दिसते. तसंच एमएमआर रिझनमधून लोक नोकरीलाही येत आहेत. गर्दी वाढत आहे. गर्दी वाढून रुग्ण संख्या वाढली की कारवाई करावी लागेल, असंही ते म्हणालेत. 

मुंबई हे शहर अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. शहरातील रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर येत्या काळात येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणं अशक्य असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच लसीकरण इतक्यात पूर्ण होणार नाही. WHO ने सांगितलं की आपल्यापद्धतीने कॅरी करा, असंही अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. 

Nightclub is likely close soon Mumbai Hint from Guardian Minister Aslam Sheikh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.