हुश्श...अखेर निळजे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला! अवघ्या 15 दिवसात 'एमएसआरडीसी'ने केली पुलाची दुरुस्ती

हुश्श...अखेर निळजे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला! अवघ्या 15 दिवसात 'एमएसआरडीसी'ने केली पुलाची दुरुस्ती
Updated on

मुंबई : कल्याण - शीळ रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाणपूल शनिवारी (ता.11)सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.  हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल  आयआयटी मुंबईने दिल्यानंतर 15 जून पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जोडणारा कल्याण-शीळ रस्ता आणि त्यावरचा निळजे रेल्वे उड्डाणपूल इथल्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याने, एमएसआरडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने दुरुस्ती काम करून फक्त 15 दिवसांत पूल पुन्हा सुरू केला.

यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. अखेर एमएसआरडीसीने रेल्वे अभियंत्यांशी चर्चा करून दुरुस्तीची योजना तीन टप्प्यात  आखली. यामध्ये पुलावरचा अतिरिक्त भार कमी करणे, काँक्रिट स्लॅब मजबूत करणे, कमकुवत झालेल्या स्टील गर्डरचं मजबुतीकरण करणे अशा तिन टप्यात पुलाचे काम पुर्ण करण्यात आले. 

यामध्ये सर्वात आधी पुलावरचा अतिरिक्त 80 मिमी डांबराचा थर काढला. 10 मेट्रिक टन भार हलका झाला, इपॉस्की ग्राऊटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाच्या काँक्रिट स्लॅबचं मजबुतीकरण केलं, पुलाच्या पृष्ठभागावर फक्त 30 मिमी मास्टीक थर देण्यात आला. पुलाच्या 4 पैकी 2 गर्डरमध्ये गंज लागून हाणी तपासण्यात आली, त्यानंतर त्याच लांबीमध्ये  बोल्टिंग करून स्टील प्लेट बसवण्यात आल्या. यापुढेही गर्डर गंजू नयेत. म्हणून अँटि कोरोशन पेंट देखील देण्यात आला.  

चाचणीशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करणं शक्यच नसल्याने,  दुरुस्ती तपासण्यात आली. यामध्ये प्रत्यक्ष लोडटेस्ट देखील घेण्यात आले. कल्याण-डोंबिवलीमधला सक्तीचा लॉकडाऊन आणि वरून धो धो कोसळणारा पाऊस, या अडचणी असून देखील एमएसआरडीसी आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी फक्त 15 दिवसांत पुलाची दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी अखेर खुला करण्याच आला असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे.

----------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.