'निसर्ग' रौद्र रुप घेतोय! चक्रीवादळ मुंबईच्या आणखी जवळ

'निसर्ग' रौद्र रुप घेतोय! चक्रीवादळ मुंबईच्या आणखी जवळ
Updated on

मुंबई- सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाचा निसर्ग वादळाचं संकट मुंबईसह कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. निसर्ग वादळ मुंबईच्या आणखी जवळ आलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी 11.30 च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. ताशी 13 किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान, वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या मुंबईपासून हे वादळ 250 तर अलिबागपासून 200 किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून 200 आणि अलिबागपासून 155 किमी अंतरावर असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये बुधावारी पहाटेपाससून वेगानं वारे वाहत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला मोठं वादळ आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. अलिबाग, ठाल नव्हंगाव आणि किहीम समुद्रकिनाऱ्याला या वादळाचा मोठा धोका आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. 

मुंबईत यंत्रणा सज्ज 

या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.

मुंबई ठाण्यात पावसाला जोर 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह कल्याण आणि बदलापूरमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत ही पाऊस सुरु आहे. ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसरातही पाऊस पडतोय. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

मुख्यमंत्र्यांनी किनारपट्टीजवळील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. या चक्रीवादळासाठी लष्कर, वायू आणि जलसेना तयार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण सज्ज असून एनडीआरएफच्या तुकड्या तैनात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.