मुंबई : विधानसभा आणि विधानपरिषदेत आज नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा (NIT) मुद्दा गाजला. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकार परिषदेत बचाव करण्याचा प्रयत्न केला. (NIT Land Scam Devendra Fadnavis supporting for CM Eknath Shinde)
फडणवीस म्हणाले, "एका वाक्यात सांगायचं झाल्यास हा आरोप कसा होता तर खोदा पहाड और चुहा भी नही निकला. खरं म्हणजे हे सगळे भूखंडाचे श्रीखंड खाण्याचे जे प्रकार आहेत त्याचा त्यांना इतका सराव आहे. की त्यांना माहितीच नव्हतं की, नागपूरमध्ये गुंठेवारीमध्ये गरीबांची घरं २००१ मध्ये नियमित करण्याचा निर्णय झाला, त्या घरातील ही घरं आहेत. त्याचा हा लेआऊट आहे. त्या लेआऊटबाबत शिंदेंनी निर्णय घेतलेला नाही. २००७ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जे ४९ लेआऊट मंजूर केले त्यातले हे लेआऊट आहेत.
हीट अँड रन करताना पळता भुई थोडी
त्यामुळं मला असं वाटतं की, त्यांच्या हीट अँड रनमध्ये आम्ही त्यांना पळूही दिलं नाही पण पळता भुई थोडी केली. त्यांच्या आरोपांना आम्ही चोख उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे बाहेर तरी बोलू लागलेत - फडणवीस
फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की सभागृहात नव्हे तर सभागृहाच्या बाहेर तरी उद्धव ठाकरे बोलू लागले आहेत. त्यामुळं तुम्ही कितीही पहाड उभे केले तरी खोट्याचा पहाड कधी कामाला येत नाही. खऱ्याचं दगडही खोट्या डोंगराला उद्ध्वस्त करु शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.