Ambani Family : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डावरून नीता अंबानी पायउतार, मात्र सांभाळणार ही जबाबदारी

Ambani Family : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदाचा दिलेला राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला
Ambani Family
Ambani Family sakal
Updated on

Ambani Family : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या संचालक मंडळाने आजच्या बैठकीत ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव भागधारकांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

त्याचवेळी नीता अंबानी यांनीही संचालक मंडळातून पदत्याग करण्याची घोषणा केली आहे.

Ambani Family
Mumbai News : मध्य रेल्वेचा हार्बर मार्ग कचऱ्यात

या तिघांच्या संचालक मंडळावरील नियुक्तीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला त्यांच्या नव्या कल्पनांच्या आणि ज्ञानाचा फायदा मिळेल असे संचालक मंडळाने म्हटले आहे.नीता अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशन च्या कामाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदाचा दिलेला राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला आहे.

Ambani Family
Mukesh Ambani News : जिओचा मोठा धमका! Jio AirFiber देणार हाय स्पीड 5G इंटरनेट; गणेश चतुर्थीला होणार लाँच

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या सर्व बैठकांना कायमस्वरूपी आमंत्रित म्हणून हजर राहू शकतील.तर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे गेले काही वर्षे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कामात वेगवेगळ्या प्रकारे सहभागी होतेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.