मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांची सुनावणी पूर्ण झाली असून राणेंना मोठा धक्का बसला आहे. दुपारी दोन वाजता या प्रकरणाची उर्वरित सुनावणी पार पडणार असून राणे यांच्यासोबत नाव आलेले मनिष दळवी यांच्या जामीनावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय. मात्र नितेश राणे यांना तूर्तास जामीन नाकारण्या आला आहे. (Bombay High court rejected bail to nitesh rane )
नितेश राणे यांची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी सेनेचे नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचं म्हटलं जातंय. यानंतर राणेंनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. (nitesh rane bail rejected)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक करण्यात येणार होती. त्याबाबत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयानं नितेश राणेंचा जामीन फेटाळला होता. राणे यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि १२० ब सह ३४ (कटकारस्थान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारापासून दूर करण्यासाठी शिवसेनेने मला या प्रकरणात अडकवले आहे, असा आरोप अर्जात करण्यात आला होता. यामध्ये माझा सहभाग नसून राजकीय वैमनस्यामधून फिर्याद नोंदवण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर अखेर सुनावणी पार पडली.
काय आहे प्रकरण?
१८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाची सुई आमदार नितेश राणे यांच्याकडे गेली होती. त्यामुळं कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्यावतीनं जिल्हा न्यायालयात २७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर २८ व २९ रोजी सुनावणी झाल त्यानंतर कोर्टानं निकाल राखून ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता याबाबतचा निकाल न्या. एस. व्ही. हांडे यांनी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.