मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांची अटक टळली आहे. मुंबई हायकोर्टानं त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. पण हा दिलासा देताना एक महत्वाची अट देखील घातली आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी राणे यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं.
संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात माझगाव कोर्टानं ऑगस्ट महिन्यात राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होत. अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती शाम चांडक यांनी निर्णय दिला आहे.
माझगाव कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर मुंबई हायकोर्टाकडून नितेश राणे यांचं वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळं आता अब्रू नुकसानीच्या खटल्यात नितेश राणेंना माझगाव कोर्टात हजेरी लावावीच लागणार आहे. 17 ऑक्टोबरला राणे कोर्टात हजेरी लावणार आहेत.
७ मे २०२३ रोजी नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टिप्पणी करताना ते १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता. त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगताना याद्वारे राणेंनी आपली बदनामी केली असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. यानंतर माझगाव कोर्टानं राणेंना समन्स बजावलं होतं. पण हे वॉरंट आपल्याला मिळालं नाही, असं सांगत ते कोर्टात हजर राहिले नव्हते. त्यानंतर कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.