Nitin Desai: नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली होती.
Nitin Chandrakant Desai
Nitin Chandrakant Desai esakal
Updated on

मुंबई- प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली होती. पण, आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. खालापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करणे, तसेच अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी आरोपींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने तुर्तास दिलासा देण्याचे नाकारले असून 18 ऑगस्टला यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. राजकुमार बंसल यांच्यासह अन्य आरोपींनी ही याचिका केली होती. (nitin desai death case high court decline petition khalapur police)

नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ECL finanace कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्यानं तगादा लावत मानसिक त्रास दिला असे तक्रारीत म्हटले गेले होते. त्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले.

Nitin Chandrakant Desai
Tomato Price: टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी चक्क अर्थमंत्र्यांचा पुढाकार, थेट नेपाळहून...

नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कलाकृतींनीं त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते.त्यात त्यांचे जाणे हे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. (Latest marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.