मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi national park) मागाठाणे विधानसभा (Magathane Assembly) l क्षेत्रातील वनविभागाच्या हद्दीतील सुमारे पाच हजार घरांना कायमस्वरुपी वीजजोडणी (Permanent Electricity) मिळणार असून त्यांना आता वाणिज्यिक दराऐवजी घरगुती दराने वीजबिले आकारली जातील. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (prakash surve) यांच्या पाठपुराव्यामुळे या रहिवाशांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
प्रकाश सुर्वे यांनी याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. या संदर्भात कालच सुर्वे यांची ऊर्जामंत्री आणि अदानी वीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या वीज ग्राहकांना घरगुती दराने वीज बिल आकारावे असे निर्देश उर्जामंत्र्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला दिल्याची माहिती सुर्वे यांनी दिली.
येथील वसाहतीतील नागरिकांना वनविभागाच्या हरकतीमुळे वैयक्तिक घरगुती वीज जोडणी घेता येत नाही. त्यावर तोडगा म्हणून त्यांना सामायिक मीटरद्वारे वीज पुरवठा होत होता. मात्र त्याचमुळे त्यांना घरगुती दराने वीज मिळत नव्हती तर जादा व्यापारी दराने वीज घ्यावी लागत होती. या वस्त्या अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यांना वाणिज्यिक दराने वीजबिल भरणे कठीण होते. त्यामुळे निवासी दराने वीजबिल आकारणी करावी अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी या बैठकीत केली.
वनविभागाच्या हरकतीमुळे या रहिवाशांना वेगळे मीटर मिळत नव्हते. त्यामुळे वनविभागाच्या हद्दीतील अनेक रहिवासी तर हद्दीपलिकडे राहणाऱ्या झोपडपट्ट्यांमधून चोरून विजेचे कनेक्शन घेत असत. अर्थात तरीही त्यांना मूळ घरमालकाचे पूर्ण वीजभाडे व स्वतःचे वीजभाडे असा दुप्पट भुर्दंड पडत असे. ज्यांना महागडी वीज परवडत नसे, त्यांचेही पुष्कळ हाल होत असत. आता या रहिवाशांची या सर्व हालअपेष्टांमधून सुटका होईल.
जानूपाडा, पांडे कंपाउंड, वैभव नगर कांदिवली ( पूर्व ), दामूनगर, भीमनगर, आंबेडकर नगर, गौतम नगर कांदिवली ( पूर्व ) येथील पंचवीस हजार रहिवाशांना या निर्णयाचा फायदा मिळेल. या बैठकीस माजी नगरसेवक योगेश भोईर, शाखाप्रमुख विठ्ठल नलावडे, सचिन केळकर, रवी हिरवे, मछिंद्रनाथ डावरे, बापू चव्हाण, सुनील कांबळे अदानी ईलेक्ट्रिसिटीचे नराळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.