मुंबई - वाहनावर मराठी भाषेतील नंबरप्लेटवर आता कारवाई होणार नाही. या संदर्भात वाहतूक पोलीसांनी स्पष्टीकरण दिली आहे. वाहनांच्या नंबर प्लेट्सच्या नियमांबाबत स्पष्टीकरण देताना, वाहनांच्या क्रमांकाची पाटी मराठी भाषेत असणं हा काही गुन्हा नाही फक्त वाहनाच्या नंबरप्लेटवरील नंबर हा फॅन्सी नसावा.
तसेच ओळखता येईल अशा मराठी भाषेत असेल तर कायदयाने गुन्हा ठरत नाही असं सांगितलं आहे. या संदर्भात पोलीस अधिका-यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाहतुक नियमांचे उल्लघन करणा-या वाहन चालकांवर ई-चलन कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
पनवेल येथील रहिवासी आशिष कार्ले यांनी 24 ऑगस्ट रोजी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे मराठी नंबरप्लेटवर कारवाई संदर्भात तक्रार दाखल केली होती. मराठीत नंबर प्लेट वापरल्याबद्दल वाहनधारकांना दंड का ठोठावला जातो असा प्रश्न तक्रारीत केला होता.
आशिष कार्ले यांना दिलेल्या उत्तरात मुंबई वाहतूक पोलिसांनी मराठी नंबरप्लेटचा वापर करणे गुन्हा नसल्याचं स्पष्ट केले आहे. भारतातील विविध राज्यांतील वाहने त्यांच्या राज्य भाषेतील अक्षरे आणि अंक वापरू शकतात, परंतु फॅन्सी नंबर प्लेट वापरण्यावर बंदी आहे. महाराष्ट्रात वाहनधारकांना मराठी नंबर प्लेट वापरता येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.