Assembly Election 2024 : विधानसभेच्या १२ जागांबाबत तडजोड नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीला इशारा

विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ व यशस्वी लढे केलेल्या केवळ १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे.
No compromise on 12 Assembly seats Warning to Mahavikas Aghadi Marxist Communist Party
No compromise on 12 Assembly seats Warning to Mahavikas Aghadi Marxist Communist Partysakal
Updated on

विरार : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ व यशस्वी लढे केलेल्या केवळ १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. इतर डाव्या व पुरोगामी पक्षांनीही आपला प्रभाव असलेल्या मर्यादित जागांची मागणी केली आहे.त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती, आणि आपण लढणार असणाऱ्या १२ जागांची यादी या सर्व नेत्यांना तेव्हाच लिखित स्वरूपात सादर केली होती.

महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांच्या बाबत आपसात वाटाघाटी कराव्यात अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष मात्र माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत.

इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे. यापूर्वी लोकसभेला केलेली चुकपुन्हा एकदा आघाडीतील महत्वाचे तिन्ही पक्ष करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी डॉ. उदय नारकर यांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूला हे प्रमुख तीनही पक्ष वेगवेगळ्या संवाद यात्रा, सभा व प्रसार माध्यमांमधील चर्चेच्या माध्यमातून माकपने व इतर डाव्या पक्षांनी लढवण्यासाठी सादर केलेल्या जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केंद्रस्थानी आणत आहेत. महाविकास आघाडीतील या तीन पक्षांची ही कृती समन्वयाच्या व एकजुटीच्या प्रक्रियेस बाधा आणणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पार्श्वभूमीवर जाहीर मागणी करतो की विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणूक लढण्याबद्दल त्यांचे आग्रह अत्यंत प्रामाणिकपणाने विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी.

मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल.असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी डॉ. उदय नारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आईआ काँग्रेस यावर काय निर्णय घेते ते पाहणे महतवाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.